bachhu kadu
bachhu kadu Team Lokshahi

बच्चू कडूंना आंदोलन पडले महाग, न्यायालयाने सुनावली 14 दिवसांची कोठडी

पोलिसांनी बच्चू कडू यांना ताब्यात घेतले असून त्यांना मरीन ड्राईव्ह पोलिस ठाण्यात नेण्यात आले आहे
Published by :
Sagar Pradhan

माजी मंत्री आणि प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांचा जामीन अर्ज गिरगाव कोर्टा कोर्टानं फेटाळला आहे. आमदार बच्चू कडू यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. बच्चू कडू यांच्याविरोधात राजकीय आंदोलन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. हे 2018 मधील प्रकरण आहे.त्यावरच आता कोर्टाने आमदार कडू यांना मोठा धक्का दिला आहे.

bachhu kadu
...तर एखाद्या मुख्यमंत्र्यांने उद्योग मंत्र्याचा राजीनामा घेतला असता : आदित्य ठाकरे

राजकीय आंदोलन प्रकरणी बच्चू कडू यांना कोर्टानं 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. मुंबईतील गिरगाव महानगर दंडाधिकारी न्यायालयानं बुधवारी हा निर्णय दिला. राजकीय आंदोलन प्रकरणी बच्चू कडू यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. राजकीय आंदोलन प्रकरणी बच्चू कडू यांच्याविरुद्ध न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते. त्यानंतर राजकीय आंदोलन केल्याप्रकरणी दाखल केलेल्या निषेधाच्या गुन्ह्यात ते आज स्वतःहा गिरगाव न्यायालयात हजर झाले होते. त्यानंतर न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. दरम्यान, या निर्णयानंतर त्यांनी सत्र न्यायालयात अपील दाखल केल्याची माहिती समोर आली आहे.

bachhu kadu
वेदांता प्रकल्प महाराष्ट्रात येणार नाही हे 2020 लाच समजले होते; उदय सामंतांचा मोठा खुलासा

नेमकं काय आहे प्रकरण?

आमदार बच्चू कडू हे एम.पी.एस.सी , परीक्षा घेण्यात येणाऱ्या महापोर्टल बंद करण्यासाठी तत्कालीन , पी, प्रदीप .महाराष्ट्र राज्य माहिती तंत्रज्ञान संचालक यांची 26 सप्टेंबर 2018 रोजी मंत्रालय येथे भेट घेतली होती. यावेळी पी प्रदीप आणि आमदार बच्चू कडू यांच्यत वाद झाला होता. तेव्हा , बच्चू कडू यांनी टेबलावरील लॅपटॉप पी प्रदीप यांच्यावर उगारला होता , त्यामुळे मंत्रालय कर्मचारी यांनी उग्र आंदोलन केले होते. तर याप्रकरणी प्रदीप यांनी बच्चू कडू यांच्यावर गुन्हा दाखल केला होता.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com