Devendra Fadanavis | Sharad Pawar
Devendra Fadanavis | Sharad Pawar Team Lokshahi

'...म्हणून हे हिंदू राष्ट्रच' पवारांच्या 'त्या' विधानावर फडणवीसांचा पलटवार

सावरकरांच्या काही भूमिकेला आम्हा लोकांचा पाठिंबा नाही. त्यांनी हिंदुत्वाची जी भूमिका घेतली, ती मान्य नाही, पवारांचे विधान.
Published by :
Sagar Pradhan

राज्यासह देशाच्या राजकारणात सध्या स्वातंत्रवीर सावरकरांवरून चांगलेच तापलेले आहे. त्यातच दुसरीकडे काँग्रेस नेते यांनी सावरकरांबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानामुळे राज्यात राहुल गांधींविरूध्द भाजप चांगलाच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. राहुल गांधींच्या विधानामुळे भाजप आणि शिवसेनेनं काही दिवसांपुर्वी सावरकर गौरव यात्रेचं देखील आयोजन केले होते. हे सर्व होत असताना राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी स्वातंत्रवीर सावरकरांबद्दल पुन्हा एक मोठे विधान केले. सावरकरांच्या काही भूमिकेला आम्हा लोकांचा पाठिंबा नाही. त्यांनी हिंदुत्वाची जी भूमिका घेतली ती मान्य नाही. असे शरद पवार म्हणाले. त्यावर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Devendra Fadanavis | Sharad Pawar
महागाई, बेरोजगारी, शेतकरी प्रश्न असताना सत्ताधारी अयोध्येत; शरद पवारांचा निशाणा

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

मुख्यमंत्री शिंदे आज अयोध्या दौऱ्यावर आहेत. या दौरात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील दाखल झाले होते. त्यावेळी लखनऊमध्ये त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी माध्यमांच्या प्रतिनिधींकडून त्यांना शरद पवार यांच्या विधानाबाबत विचारण्यात आले तेव्हा ते म्हणाले की, ते काय म्हणता त्याच मला काही घेणंदेणं नाही. आम्हाला मान्य आहे. आमचं एक म्हणंण आहे. भारतात सर्वाधिक हिंदू राहतात. त्यामुळे तुम्ही याला हिंदू राष्ट्र म्हणा किंवा नका म्हणु हे हिंदू राष्ट्रच आहे. असे फडणवीस यावेळी म्हणाले.

पुढे त्यांनी विरोधकांकडून होणाऱ्या मुख्यमंत्र्यांचा अयोध्या दौऱ्यावर देखील प्रत्युत्तर देले. ते म्हणाले, त्यांच कामच आहे टीका करण्याचे. त्यांना आस्था असेल किंवा नसेल परंतु आम्हाला आस्था आहे. प्रभू श्रीराम हे असं व्यक्तिमहत्व की ज्यांनी रामराज्य कसे चालवावे हे शिकवले. गांधींची देखील हिच भूमिका होती. त्यामुळे रामराज्य चालवायचे तर प्रभू श्रीरामाचे दर्शन घ्यावे लागेलच.

नेमकं काय म्हणाले होते शरद पवार?

शरद पवार हे दोन दिवसीय नाशिक दौऱ्यावर असून आज सकाळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, सावरकरांच्या काही भूमिकेला आम्हा लोकांचा पाठिंबा नाही. त्यांनी हिंदुत्वाची जी भूमिका घेतली, ती मान्य नाही पण सावरकरांनी पुरोगामी विचारही मांडले. जसे की त्यांनी घरासमोर मंदिर बांधले होते, त्या मंदिराचा पुजारी दलित वर्गातील होता. त्यामुळे सावरकरांबद्दल प्रत्येकाची भूमिका वेगळी असू शकते, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद यांनी व्यक्त केले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com