Amruta Fadnavis
Amruta FadnavisTeam Lokshahi

जेव्हा नेत्यावर बोलता येत नाही, तेव्हा विरोधक पत्नीवर बोलतात, अमृता फडणवीसांचे वक्तव्य

विरोधकांनी माझं नुकतंच प्रदर्शित झालेल्या गाण्यालाही सोडलं नाही. त्यांनी माझ्या मागच्या गाण्यांच्या वेळीही मला सोडलं नव्हतं.

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस ह्या नेहमीच काही ना काही विषयाने चर्चेत असतात. मनोरंजन क्षेत्रासह त्या राजकारणावर देखील कायम भाष्य करत असतात. त्यातच आता अमृता फडणवीस यांनी आता महत्वाचे विधान केले आहे. जेव्हा नेत्यावर बंदूक ताणण्यालायक काही दिसत नाही, त्यांच्यावर बोट उचलण्यालायक काही दिसत नाही तेव्हा अनेकदा त्यांच्या पत्नीच्या मागे लागलं जातं. विरोधक तेच करत आहेत. असे अमृता फडणवीस एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाल्या.

Amruta Fadnavis
'प्रकाश आंबेडकर आणि सुषमा अंधारेंमुळे उद्धव ठाकरेंची प्रचंड ताकद वाढणार' रामदास कदमांच्या शुभेच्छा

अमृता फडणवीस यांचं नुकतंच एक गाणं प्रदर्शित झाले आहे. या गाण्यात अमृता या नृत्य करताना दिसत आहेत. शिवाय हे गाणं त्यांनी स्वत: गायलं देखील आहे. हे गाणे लोकांच्या पसंतीत देखील पडत आहे. भरपूर कौतुक होत असताना मात्र, दुसरीकडे काही जणांकडून त्यांना सोशल मीडियावर ट्रोलही केलं जातं आहे. यावरच अमृता फडणवीस यांनी उत्तर दिले आहे. जेव्हा नेत्यावर बोलता येत नाही, तेव्हा विरोधक पत्नीवर बोलतात. अशी टीका अमृता फडणवीस यांनी विरोधकांवर केलीय. मलाही विरोधकांनी ट्रोल केलं. पण मी काम करत राहिली, असं विधान अमृता यांनी केलं.

विरोधकांनी माझं नुकतंच प्रदर्शित झालेल्या गाण्यालाही सोडलं नाही. त्यांनी माझ्या मागच्या गाण्यांच्या वेळीही मला सोडलं नव्हतं. पण ते मी समजू शकते की, ते देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय क्षेत्रातील स्थानामुळे आहे. आता मला त्याची सवय झालीय. पण तेवढाच मला आनंद आहे. मी सातत्याने करत राहिली आणि लोकांचंसुद्धा सहकार्य वाढत गेलं, अशी प्रतिक्रिया अमृता फडणवीस यांनी दिली.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com