शाळेत गौतमी पाटीलला ज्यांनी नाचवलं तो घरी जाईल; दीपक केसरकरांचा इशारा

शाळेत गौतमी पाटीलला ज्यांनी नाचवलं तो घरी जाईल; दीपक केसरकरांचा इशारा

नाशिकच्या जिल्हा परिषदेच्या शाळेत गौतमी पाटीलचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
Published by :
Siddhi Naringrekar

नाशिकच्या जिल्हा परिषदेच्या शाळेत गौतमी पाटीलचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावरुन अनेक प्रतिक्रिया येत आहे. याच पार्श्वभूमीवर आता शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी प्रतिक्रिया दिली.

दीपक केसरकर म्हणाले की, गौतमी पाटील हिला कोणी नाचवलं, हे आपल्याला माहित नाही, पण ज्यांनी नाचवलं तो घरी जाईल. असे केसरकर म्हणाले. तसेच ते पुढे म्हणाले की, एनजीओकडून वेगवेगळे उपक्रम राबवले जातात. मुलांपर्यंत हे पैसे अजिबात पोहोचत नाही. शाळेसाठी चांगल्या सुविधा निर्माण होत असतील आणि त्यासाठी पैसे येत असतील तर तुम्हाला आक्षेप काय आहे? असे केसरकर म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com