शिंदेंच्या भाषणावेळी डुलक्या काढण्यावर केसरकर म्हणाले, झोपलो नव्हतो तर...

शिंदेंच्या भाषणावेळी डुलक्या काढण्यावर केसरकर म्हणाले, झोपलो नव्हतो तर...

शिंदेंच्या भाषणावेळी दीपक केसरकरांना स्टेजवरच डुलकी लागल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यावर आता दीपक केसरकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मुंबई : एकनाथ शिंदे यांचा दसरा मेळावा बीकेसीवर पार पडला. या मेळाव्याला लाखो लोकांची गर्दी होती. यावेळी एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरेंवर जोरदार टीका केली. मुख्यमंत्र्यांनी तब्बल 1 तास 48 मिनीटे भाषण केले. यादरम्यान शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकरांना स्टेजवरच डुलकी लागल्याचा दावा विरोधकांनी केला आहे. याचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला होता. यावर आता दीपक केसरकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

शिंदेंच्या भाषणावेळी डुलक्या काढण्यावर केसरकर म्हणाले, झोपलो नव्हतो तर...
शिंदे का ठाकरे, धनुष्यबाण कुणाचे? शिवसेनेला उद्या दुपारपर्यंतची अंतिम मुदत

एकनाथ शिंदे यांच्या भाषणादरम्यान दीपक केसरकरांना डुलकी आल्याचा फोटो व्हायरल झाल्यानंतर विरोधी पक्षांनी निशाणा साधला होता. शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकरांनी कालच्या मेळाव्यासाठी शिंदे गटातील आमदारांनी अपार मेहनत घेतली होती, त्यामुळे केसरकरांना व्यासपीठावरच झोप लागली होती, अशी टीका केली होती. तर, केसरकर यांना एकनाथ शिंदे यांच्या भाषणावेळी डुलकी लागली नव्हती, तर ते हिंदुत्वाची काळजी करत आत्मचिंतन करत होते, असा टोला राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी लगावला होता.

यावर आज दीपक केसरकरांनी प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले की, दसरा मेळाव्यात मी झोपलो नव्हतो तर विचार करत होतो. मी झोपलो असतो तर माझे हात कसे हलले असते, असा प्रश्न त्यांनी विरोधकांना विचारला आहे.

शिंदेंच्या भाषणावेळी डुलक्या काढण्यावर केसरकर म्हणाले, झोपलो नव्हतो तर...
शिवाजी पार्कचा मेळावा तमाशाकरांचा; राणेंचा उध्दव ठाकरेंवर घणाघात

दरम्यान, उध्दव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यावर केसरकर यांनी प्रतिक्रिया देताना म्हणाले, उद्वव ठाकरेंच्या भाषणातील वक्तव्यांमुळे मी अस्वस्थ झालो आहे. डुक्कर ही भाषा संजय राऊतांच्या तोंडी शोभते. उद्वव साहेबांच्या तोंडी शोभत नाही. एकनाथ शिंदेंचा मला अभिमान आहे. त्यांच्याबद्दल उद्वव ठाकरे जे बोलले त्यामुळे मी अस्वस्थ आहे. मला रात्र-रात्र झोप लागत नाही. त्यासाठी मी शिर्डीला जाऊन दर्शन घेऊन मन शांत करुन आलो, असे त्यांनी म्हंटले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com