उध्दव ठाकरेंच्या भाषणाला तासभर न होताच  दीपक सावंतांनी सोडली साथ; शिवसेनेत प्रवेश

उध्दव ठाकरेंच्या भाषणाला तासभर न होताच दीपक सावंतांनी सोडली साथ; शिवसेनेत प्रवेश

उद्धव ठाकरेंना माजी आरोग्यमंत्री दीपक सावंत यांच्या रुपात आणखी धक्का बसला आहे. दीपक सावंत यांनी आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना साथ देत शिवसेनेत प्रवेश केला आहे.

मुंबई : महाविकास आघाडीच्या संयुक्त बैठकीत उध्दव ठाकरे यांनी ज्यांना जायचं असेल ते जाऊ शकतात, असे म्हंटले आहे. याला तासभरही न होताच उद्धव ठाकरेंना माजी आरोग्यमंत्री दीपक सावंत यांच्या रुपात आणखी धक्का बसला आहे. दीपक सावंत यांनी आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना साथ देत शिवसेनेत प्रवेश केला आहे.

उध्दव ठाकरेंच्या भाषणाला तासभर न होताच  दीपक सावंतांनी सोडली साथ; शिवसेनेत प्रवेश
तुम्ही केली त्यांची कोंडी, म्हणून मारली आम्ही मुसंडी; फडणवीसांचे आठवले स्टाईल अजित पवारांना उत्तर

उद्धव ठाकरे यांचे अत्यंत जवळचे नेते सुभाष देसाई यांचा मुलगा भूषण यांनी नुकतेच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. तर बबनराव घोलप यांची कन्या तनुजा घोलप यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. आता दीपक सावंत यांनी बाळासाहेब भवनमध्ये एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश पार पडला आहे.

दीपक सावंत ठाकरे गटावर नाराज असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगली होती. यामुळेच त्यांनी शिंदे गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचा शक्यता वर्तविण्यात येत आहे. दरम्यान दीपक सावंत यांच्या शिंदे गटातील प्रवेशामुळे ठाकरे गट आणि महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com