इंडिया आघाडीमध्ये 'हा' नेता नाराज; संजय राऊतांनी नावच सांगितले

इंडिया आघाडीमध्ये 'हा' नेता नाराज; संजय राऊतांनी नावच सांगितले

इंडिया आघाडीची उद्या दिल्लीत बैठक आयोजित करण्यात आली आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

इंडिया आघाडीची उद्या दिल्लीत बैठक आयोजित करण्यात आली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्याची बैठक महत्त्वाची म्हटली जात आहे. या बैठकीसाठी ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जाणार आहेत. तसेच अनेक प्रमुख नेतेही उपस्थित राहणार आहेत.

इंडिया आघाडीत ममता बॅनर्जी नाराज असल्याचे बोलले जात आहे. याच पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी माध्यमाशी संवाद साधला. यावेळी संजय राऊत म्हणाले की, उद्धव ठाकरे उद्या रात्री दिल्लीत मुक्कामी असणार आहेत. उद्या दिल्लीत मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी इंडिया आघाडीच्या प्रमुख नेत्यांची बैठक आहे.

तसेच नितीश कुमार यांची प्रकृती बिघडली आहे. अखिलेश यादव नाराज आहेत. तसेच ममता बॅनर्जी यांनी बैठकीसाठी येण्यास असमर्थता दाखवली आहे. असे संजय राऊत म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com