devendra Fadnavis
devendra Fadnavis Team Lokshahi

यंदा गणपती, नवरात्र उत्सवही जोरात उपमुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा

भाजप आमदार राम कदम यांनी आयोजित केलेल्या दहीहंडीत देवेंद्र फडणवीसांची घोषणा

मागील दोन वर्षापासून जगासह देशावर कोरोना महामारीचे संकट असल्यामुळे सर्व काही ठप्प होते. राज्यात एकही सण, उत्सव नागरिकांना साजरा करता आला नाही. केंद्र आणि राज्य सरकारकडूनही सर्व सण, वार, उत्सवांवर निर्बंध लावण्यात आले होते. मात्र, यंदा कोरोनाचा प्रादुर्भावही कमी झाल्याचं दिसत आहे. राज्यात आता शिंदे- फडणवीस सरकार आले आहे. सत्तेत आल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दहीहंडी उत्सवावरील सर्व निर्बंध हटवले. त्यानंतर यंदाचा दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. भाजप आमदार राम कदम यांनी आयोजित केलेल्या दहीहंडी उत्सवात गणपती उत्सव आणि नवरात्रोत्सवही निर्बंधमुक्त होणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

devendra Fadnavis
दहीहंडी फोडल्यावर 55 लाखांसह स्पेनला जाण्याची ऑफर, मिळणार सरकारी नोकरीही

काय म्हणाले उपमुख्यमंत्री ?

भाजप आमदार राम कदम यांनी आयोजित केलेल्या दहीहंडी उत्सवात देवेंद्र फडणवीस सहभागी झाले यावेळी त्यांनी सर्व गोविंदा पथकांना शुभेच्छा दिल्या त्यावेळी ते म्हणाले की, आपलं सरकार आलं की सगळं कसं खुलं खुलं होतं. गोविंदा जोरात, गणपती जोरात आणि नवरात्रोत्सवही जोरात होणार. खेळांच्या सुविधा आमच्या गोविंदांना मिळणार आहेत. आपण विकासाची हंडी फोडलीय. त्याची फुले सगळ्यांपर्यंत पोहोचणार आहेत. हे सर्वसामान्य माणसांचं सरकार आहे. यावेळी अशा शुभेच्छा फडणवीस यांनी उपस्थिती गोविंदाना दिल्या.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिली महत्वाची माहिती

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 21 जुलै रोजी यावर्षीचे सर्व सण निर्बंधमुक्त असतील अशी घोषणा केली होती. त्यावेळी त्यांनी दहीहंडी, गणेशोत्सव आणि मोहरम मोठ्या उत्साहात साजरे करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, त्याचवेळी कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचं आवाहनही मुख्यमंत्री शिंदे यांनी केलंय.गणेशोत्सवासाठी घालण्यात येणाऱ्या मंडपवाल्यांसाठी शिंदे-फडणवीस सरकारने महत्वाचे निर्णय घेतले आहेत. यावेळी एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, क्लिष्ट अटी व शर्ती असू नयेत यासाठी एक खिडकी योजनेचे निर्देश देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. गणेश मंडळाना नोंदणी शुल्क भरावे लागू नये यासाठी सवलत आणि सूट देण्यात आली आहे. उत्सावासाठी हमी पत्र घेण्याचीही गरज नाही अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.

Lokshahi
www.lokshahi.com