Devendra Fadnavis आणि Chandrashekhar Bawankule आज Amit Shah यांची भेट घेणार

मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषण सुरू केलं आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात मराठा समाज आक्रमक झाला असून नेत्यांना गावबंदी करण्यात आली आहे. मनोज जरांगे पाटलांना अनेक ठिकाणाहून पाठिंबा मिळताना दिसत आहे.

याच पार्श्वभूमीवर आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे अमित शाह यांची भेट घेणार आहेत. या भेटीत मराठा आरक्षणावर चर्चा होण्याची शक्यता आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com