पोलीस भरतीबाबत फडणवीसांची मोठी घोषणा, 18 हजार पदांसाठी लवकरच जाहिरात निघणार

पोलीस भरतीबाबत फडणवीसांची मोठी घोषणा, 18 हजार पदांसाठी लवकरच जाहिरात निघणार

पमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मोठी घोषणा केली आहे. लवकरच राज्यात पोलीस दलातील १८ हजार जागांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे.

कल्पना नालस्कर | नागपूर : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मोठी घोषणा केली आहे. लवकरच राज्यात पोलीस दलातील १८ हजार जागांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार असून त्याची येत्या आठवड्यात जाहिरात काढण्यात येईल, अशी माहिती फडणवीसांनी दिली आहे. यामुळे राज्यभरातील तरुणांना मोठा दिलासा मिळणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज १० लाख जवानांची भरती मोहिम सुरू करणार आहेत. या मोहिमेला ‘रोजगार मेळावा’असे नाव देण्यात आले आहे. यादरम्यान पंतप्रधान 75 हजार नवनियुक्त तरुणांना नियुक्तीपत्रे प्रदान करत आहेत. व पंतप्रधान व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे तरुणांना संबोधितही करणार आहेत. अशातच देवेंद्र फडणवीसांनी पोलीस दलातील मेगा भरतीची घोषणा केली आहे.

ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक चांगला निर्णय घेतला आहे. देशातील यामध्ये दहा लाख तरुणांना रोजगार मिळणार आहे. देशभरात या माध्यमातून दहा लाख बेरोजगाराना रोजगारांच्या संधी उपलब्ध होणार आहे, असे त्यांनी म्हंटले आहे.

येत्या वर्षभरात महाराष्ट्रातील 75 हजार तरुणांना नोकऱ्या देण्यात येणार आहे. यातील अठरा हजार पोलीस भरतीची जाहिरात येत्या आठवड्यात काढण्याचे काम महाराष्ट्र सरकार करणार आहे. या माध्यमातून मोठ्या प्रमाणात तरुणाईला प्राधान्य देण्याचा प्रयत्न महाराष्ट्र सरकारचा असणार आहे, असेही फडणवीसांनी सांगितले आहे.

दरम्यान, गिरीश महाजन यांनीही आरोग्य विभागातील भरतीसंदर्भात घोषणा केली होती. आरोग्य विभागातील १० हजार १२७ जागांसाठी भरती प्रक्रियेचं वेळापत्रक त्यांनी जाहीर केलं होते.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com