Devendra Fadnavis : 'मी पुन्हा येईल'ची ज्यांनी टिंगलटवाळी केली त्यांचा मी बदला घेणार

Devendra Fadnavis : 'मी पुन्हा येईल'ची ज्यांनी टिंगलटवाळी केली त्यांचा मी बदला घेणार

देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर डागले टीकास्त्र

मुंबई : शिंदे सरकारनं आज विश्वासदर्शक ठराव बहुमताने जिंकला असून तब्बल 164 मतांनी त्यांनी विजय मिळवला आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिंदे सरकारचा अभिनंदन प्रस्ताव मांडला. यावेळी फडणवीसांनी महाविकास आघाडीवर टीकास्त्र डागले. तर, मी पुन्हा येईल, असं म्हंटलं होतं. ज्यांनी माझी टिंगल केली. त्यांचा मी बदला घेणार असल्याचं फडणवीसांनी विधानसभेत म्हंटले आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महाविकास आघाडी सरकार आले तेव्हाच मी सांगतो होतो की हे सरकार टिकणार नाही. त्यावेळी मी पुन्हा येईन ही कविता म्हंटली होती. त्यावर अनेकांनी माझी टिंगलटवाळी केली होती. पण मी आलो आणि यांनाही घेऊन आलो. ज्यांनी टिंगलटवाळी केली त्यांचा मी बदला घेणार आहे. आणि माझा बदला हाच आहे की मी सगळ्यांना माफ केले. हर एक का मौका आता है, असे म्हणत महाविकास आघाडीला त्यांनी लक्ष्य केले.

सरकार हे संवेदनशील असले पाहिजे. कुणी आंदोलन करत आहे म्हणून ते आपले विरोधक आहेत असे मानने योग्य नाही. आंदोलक कधी आक्रमक झाले तर कारवाई करावी लागते. पण, आमच्याविरोधात बोललात तर जेलमध्ये टाकू ही अवस्था काही काळ आपल्याला पाहायला मिळाली. पण लोकशाहीमध्ये दुसरा आवाजही आहे तो आपण ऐकून घेतला पाहिजे, असेही फडणवीसांनी म्हंटले आहे.

तसेच, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीसांनी आभार मानले आहेत. मला शरद पवार यांनीदेखील संघ, संघाची भूमिका, संघाची शिस्त याचा गौरवपूर्ण उल्लेख केला, याचा आनंद आहे. त्यांनी मला संघ स्वयंसेवक म्हंटले, मी संघ स्वयंसेवकच आहे. मी त्यांचे मनापासून आभार मानतो, असेही त्यांनी म्हंटले आहे. तर, राज ठाकरे यांनी अतिशय सुंदर पत्र लिहिलं. खरंतर मी त्याला दुसऱ्या दिवशी उत्तर द्यायचा विचार केला, पण त्यांच्यासारखे शब्द मला सुचले नाहीत. म्हणून मग मी फोन करून त्यांचे आभार मानले, असेही फडणवीसांनी सांगितले आहे. स

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com