नमो शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 12 हजार मिळणार; फडणवीसांची घोषणा

नमो शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 12 हजार मिळणार; फडणवीसांची घोषणा

शिंदे-फडणवीस सरकारची आज कॅबिनेट बैठक पार पडली. या बैठकीत शेतकऱ्यांसाठी महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत.

मुंबई : शिंदे-फडणवीस सरकारची आज कॅबिनेट बैठक पार पडली. या बैठकीत शेतकऱ्यांसाठी महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. नमो शेतकरी सन्मान योजनेत आता शेतकऱ्यांना वर्षाला सहाऐवजी 12 हजार रुपये मिळणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. तर, एक रुपयांत पीक विमा योजनेलाही मंजूर करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.

नमो शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 12 हजार मिळणार; फडणवीसांची घोषणा
ठाकरे गट आणि संभाजी ब्रिगेडची महत्वपूर्ण बैठक; अरविंद सावंतांनी सांगितलं कारण

मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. नमो शेतकरी सन्मान योजनेत पंतप्रधान मोदी शेतकऱ्यांना वर्षाला 6 हजार रुपये देतात. व आता राज्य सरकार देखील 6 हजार रुपये देणार आहेत. यामुळे वर्षाला 12 हजार रुपये आता शेतकऱ्यांना मिळणार आहेत.

तर एक रुपयात पीक विमा शेतकऱ्यांना देण्यात आला आहे. रजिस्टर यांच्यासाठी 1 रुपया ठेवण्यात आला आहे. पंजाबराव मिशन संपूर्ण राज्य करता लागू केलं आहे. शेतकरी प्रशिक्षित करणार आहोत. हजारांच्या वर प्रयोगशाळा तयार होणार आहेत, असे फडणवीसांनी सांगितले.

दोन महत्वाच्या योजना आज मान्य केल्या. राज्याच्या आयटी पॉलिसीमध्ये गुंतवणूक करण्यात येणार आहे. एम हबदेखील आपण तयार करणार आहोत. याशिवाय माहिती वस्रो उद्योग धोरणला देखील मंजुरी दिली आहे. कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मदत देणार आहोत, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com