राजकारण
महापालिका निवडणुकांबाबत देवेंद्र फडणवीस यांचं विधान परिषदेत मोठं विधान, म्हणाले...
राज्यातील महापालिका निवडणुका रखडल्या आहेत.
राज्यातील महापालिका निवडणुका रखडल्या आहेत. सरकारमुळेच या निवडणुका रखडल्या असं विरोधकांनी म्हटले होते. याच पार्श्वभूमीवर विधानसभेत बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, जाणीवपूर्वक सांगतो, मुंबई महापालिकेसहीत सर्व पालिकेच्या आम्हाला निवडणुका हव्या आहेत. आम्ही तयारीत आहोत. आम्हाला पाहिजे निवडणूक. पण सर्वोच्च न्यायालयाच्या पुढे जाता येत नाही. तरीही आपल्याला वाटत असेल तर निवडणूक आयोग स्वायत्त आहे.
निवडणूक घेण्याचा अधिकार राज्य सरकारला नाही. निवडणूक घेण्याचा अधिकार मुंबई महापालिका 1888 कलम 18 (1) अन्वये महापालिकेच्या सर्व निवडणुका घेण्याचा अधिकार हा निवडणूक आयोगाला आहे. निवडणूक आयोगाने 4 ऑगस्ट 2022 अन्वये महापालिकेला सार्वत्रिक प्रक्रिया थांबवण्याचे आदेश दिले आहेत. असे फडणवीस म्हणाले.