मुंब्रा शाखेवरुन ठाकरे-शिंदे गटात राडा; फडणवीस म्हणाले...

भाजपच्या पालावरची दिवाळी उपक्रमास आजपासून सुरुवात झाली आहे. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला.
Published by  :
Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : भाजपच्या पालावरची दिवाळी उपक्रमास आजपासून सुरुवात झाली आहे. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. राज्यातील सर्व जनतेला दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. महाराष्ट्रात पाऊस कमी झाल्याने दुष्काळाची परिस्थिती आहे मात्र आम्ही सर्कलनुसार येणाऱ्या काळात शेतकऱ्यांना अधिकची मदत देणार आहोत, असे देवेंद्र फडणवीसांनी सांगितले आहे. धनंजय मुंडे यांचे वक्तव्य मी ऐकले नाही. मात्र, शेतकऱ्यांना यादी सरकारने मदत केली आणि आताही सर्वाधिक मदत हे सरकार करेल, असेही त्यांनी म्हंटले आहे.

शिवसेनेची मुंब्रा येथील शाखा शिंदे गटाकडून पाडण्यात आल्यानं मोठा वाद निर्माण झाला. यावेळी ठाकरे आणि शिंदे गटात प्रचंड राडा देखील पहायला मिळाला. याबाबत फडणवीसांना विचारले असता ते म्हणाले, कालचा दिवस संपला कालचे विषयही संपले आज नवीन दिवस आहे, असे म्हणत त्यांनी प्रतिक्रिया देणे टाळले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com