देवेंद्र फडणवीस अचानक अयोध्या दौऱ्यावर; स्वतःच सांगितले कारण

देवेंद्र फडणवीस अचानक अयोध्या दौऱ्यावर; स्वतःच सांगितले कारण

राज्यातील सत्तांतरानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पहिल्यांदाच अयोध्या दौऱ्यावर आहेत.

लखनऊ : राज्यातील सत्तांतरानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पहिल्यांदाच अयोध्या दौऱ्यावर आहेत. शिवसेनेचा दौरा असताना रामलल्लाचे दर्शन घेण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही अयोध्येत दाखल झाले होते. फडणवीस अचानक अयोध्येला आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. यावर या भूमीशी माझं नातं आहे. रामलल्लाचं दर्शन घेण्याची इच्छा होती म्हणून मी आलोय, असे देवेंद्र फडणवीसांनी सांगितले आहे.

देवेंद्र फडणवीस अचानक अयोध्या दौऱ्यावर; स्वतःच सांगितले कारण
मुख्यमंत्र्यांची ही फालतुगिरी; अजित पवारांचा हल्लाबोल,...म्हणजे आमच्या अंगाला भोकं पडत नाहीत

शरद पवार यांनी अयोध्या दौऱ्यावर टीका केली आहे. त्यावरही फडणवीसांनी उत्तर दिलं आहे. त्यांचं कामच आहे टीका करणं. त्यांना कदाचित अस्था नसेल. आम्हाला अस्था आहे. राज्यकारभार कसा असावा हे प्रभू श्रीरामाने सांगितलं आहे. रामराज्याची संकल्पना राबवायची असेल तर रामाचं दर्शन घेतलं पाहिजे, असे त्यांनी म्हंटले आहे. तसेच, शिवसेना आणि भाजपची युती 100 टक्के नैसर्गिक युती आहे. बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना पाहायला मिळत आहे. वारसा जन्माने नाही तर कर्माने मिळतो हे शिंदेंनी दाखवून दिल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, अयोध्या दौरावर शरद पवारांनी सर्व मंत्रीमंडळ, आमदार, खासदार अयोध्येत गेले. सध्या महागाई, बेरोजगारी असे अनेक प्रश्न आहे. अतिवृष्टीमुळे नुकसान झालं. हे सगळं सोडून सगळ्यांना घेऊन अयोध्येला जायचं, यात प्राधान्य कशाला द्यायचं, हे ठरवा, असा निशाणा शिंदे-फडणवीसांवर साधला होता. आमची श्रद्धा शेतकऱ्यांशी निगडित आहे. प्रत्येकाची श्रद्धा वेगळी असते. प्रश्न सोडवू शकत नाही, ते लोक अशी भूमिका घेतात, असाही टोला त्यांनी लगावला होता

ओोोो
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com