उध्दव ठाकरेंसोबतच्या बैठकीत 'त्या' रात्री काय घडलं? फडणवीसांनी सगळंच सांगितले

उध्दव ठाकरेंसोबतच्या बैठकीत 'त्या' रात्री काय घडलं? फडणवीसांनी सगळंच सांगितले

उध्दव ठाकरेंच्या दाव्याला देवेंद्र फडणवीसांनी दिले उत्तर

मुंबई : पोहरादेवीची शपथ घेऊन सांगतो अडीच वर्ष शिवसेनेचा आणि अडीच वर्ष भाजपचा मुख्यमंत्री ठरला होता, असे विधान उध्दव ठाकरेंनी केले होते. याला आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले आहे. नेमके बैठकीत काय घडले होते याची संपूर्ण घडामोडच फडणवीसांनी यावेळी सांगितली. तसेच, खऱ्या अर्थाने उद्धव ठाकरे यांनी आपल्या पाठीत खंजीरच खुपसला. बेईमानीशिवाय याला काही बोलताच येत नाही, असा घणाघातही त्यांनी उध्दव ठाकरेंवर केला आहे.

उध्दव ठाकरेंसोबतच्या बैठकीत 'त्या' रात्री काय घडलं? फडणवीसांनी सगळंच सांगितले
पक्षफोडीच्या टीकेवर पहिल्यांदाच फडणवीसांचे भाष्य; म्हणाले, मी मोहिनी टाकली की...

२०१९साली काय झाले? भाजप व शिवसेना पूर्ण बहुमत आलं. अलीकडील काळात मला दुख आहे. काही लोक शप्पथ देखील खोट्या घेऊ लागले आहेत. पोहरादेवी येथे शपथ घेताना उध्दव ठाकरेंनी मनात माफी मागितली असेल. त्यावेळी युतीची बोलणी सुरु होती. मी २ दिवसांपूर्वीच अमितभाईंसोबत बोललो होतो. परंतु, एका रात्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले की आम्हाला एकदा तरी मुख्यमंत्री पद मिळाले पाहिजे.

मी रात्री १ वाजता अमित शहा यांना फोन लावला. त्यांचे म्हणणे होते की तुमच्यासोबत बोलणे झाले आहे. मी त्यांना सांगितले की तुम्ही निर्णय सांगा. त्यावेळी अमितभाईंनी सांगितले मुख्यमंत्री पदाचा फॉर्म्युला ठरला आहे. खाती व मंत्री पद द्यायची तयारी होती. पण, मुख्यमंत्री पद देता येणार नाही अन्यथा बोलणी थांबवा, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

मग मी उद्धव ठाकरे यांना सांगितले आणि त्यानंतर ते घरी गेले. पुन्हा बोलणीसाठी एक मध्यस्थी पाठवले. पालघरची जागा त्यांनी मागितली. त्याआधीच त्यांनी एक धोका केला होता. पालघरमध्ये त्यांनी उमेदवार दिला होता. त्यानंतर आम्ही तयारी दर्शविली आणि पालघरमधील उमेदवारासह आपण जागा त्यांना दिली, असेही त्यांनी सांगितले.

ज्या बाळासाहेबांच्या खोली बद्दल ते सांगतात. त्याच खोलीत उद्धव ठाकरे व अमित भाई बसले होते. यात पत्रकार परिषदेत एकटे फडणवीस बोलतील, असे दोघांनी ठरवले होते. यानंतर पत्रकार परिषदेत काय बोलायचे याची उजळणी झाली. यावेळी रश्मी वहिनी तेथे आल्या. उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यासमोर पुन्हा म्हणायला सांगितले. या गोष्टी बोलायच्या नसतात, पण बोलावे लागते आहे, असेही त्यांनी बोलून दाखवले.

त्यानंतर प्रत्येक सभेत देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली लढतोय. आपल्याला देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री बनवायचे आहे, असे सांगितले. मग त्यानंतर निवडणूक झाल्या. आपण विश्वास ठेवला व गाफील राहिलो. त्यांचे फार पूर्वीपासून बोलणे सुरु होते. त्यानंतर काय झाले हे सर्वांनाच माहिती आहे. ७ ते ८ दिवसांत हे गुंडाळत आहेत हे लक्षात आले. मग राष्ट्रवादी आपल्यासोबत आला. त्यानंतर काय झाले हे अजित पवार यांनी सांगितले आहे

खऱ्या अर्थाने उद्धव ठाकरे यांनी आपल्या पाठीत खंजीरच खुपसला. बेईमानीशिवाय याला काही बोलताच येत नाही. मोदींचे मोठे फोटो लावले होते ना. त्यांच्या नावाने मत मागितले ना. हा खंजीर देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीत नव्हता. हा भाजपाच्या पाठीत खंजीर होता. उत्तमराव पाटील यांच्या पासून काम केलेल्या प्रत्येक कार्यकर्त्यांच्या पाठीत खंजीर होता. अमित भाईंनी सांगितले राजकारणात अपमान सहन करावा, पण दगाबाजी सहन करू नये, असे म्हणत फडणवीसांनी उध्दव ठाकरेंवर शरसंधान साधले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com