उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे आम्ही शत्रू...; फडणवीसांचे मोठे विधान

उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे आम्ही शत्रू...; फडणवीसांचे मोठे विधान

सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सलग तीन दिवस सुनावणी झाली. मंगळवारी आता पुढील सुनावणी होणार आहे.

लोणी : सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सलग तीन दिवस सुनावणी झाली. मंगळवारी आता पुढील सुनावणी होणार आहे. अशातच, उद्धव आणि आदित्य ठाकरे आम्ही वैचारिक विरोधक आहोत, शत्रू अजिबात नाही, असे विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. नगर जिल्ह्यातील लोणी येथे आयोजित महसूल परिषदेला संबोधित केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

 उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे आम्ही शत्रू...; फडणवीसांचे मोठे विधान
पहाटेचा शपथविधीबाबत उर्वरित सत्य सुद्धा बाहेर येईलच : फडणवीस

आमची वैचारिक विरोधक आहोत, शत्रू अजिबात नाही. महाराष्ट्रात एक वेगळी राजकीय संस्कृती आहे. अलिकडच्या काळात एक शत्रूत्त्वाची भावना पाहायला मिळते. पण, ती आपल्याला संपवावी लागेल. उद्धवजी आणि आदित्य यांनी वेगळा राजकीय मार्ग पत्करला, आमचा मार्ग वेगळा आहे. त्यामुळे आम्ही शत्रू नाही, तर वैचारिक विरोधक आहोत, असे एका प्रश्नाच्या उत्तरात फडणवीस म्हणाले. शिवसेनेतील फूट फडणवीसांनी केली या आरोपांसंदर्भात पत्रकारांनी विचारले असता संजय राऊतांना माझी क्षमता अधिक वाटत असेल. त्याबद्दल त्यांचे आभार मानू या.

पण, अलिकडे संजय राऊत जे बोलतात ते अजिबात गांभीर्याने घेण्यासारखे नसतात. ते एका राजकीय पक्षाचे प्रवक्ते आहेत, त्यामुळे त्यांनी वस्तुस्थिती पाहून किंवा लोकांना खरे वाटेल, असे बोलले पाहिजे. अर्थात तो त्यांचा प्रश्न आहे. पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वेसंदर्भात केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे बैठक झाल्यानंतर आता केंद्रीय मंत्रिमंडळात तो प्रस्ताव जाईल आणि या प्रकल्पासाठी कुठलाही निधी कमी पडू दिला जाणार नाही, असेही फडणवीस यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.

दरम्यान, हळूहळू जे गौप्यस्फोट होताहेत, हे चांगलेच आहेत. मी जे बोललो तेच खरे होताना दिसते आहे. आतापर्यंत अर्धेच बाहेर आले आहे. अजून अर्धी गोष्ट बाहेर यायची आहे. काळजी करु नका, संपूर्ण गोष्ट सुद्धा बाहेर येईल, असेदेखील फडणवीसांनी म्हंटले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com