माझ्या कुटुंबास अडकवण्याचा प्रयत्न; अमृता फडणवीसांवर उपमुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया

माझ्या कुटुंबास अडकवण्याचा प्रयत्न; अमृता फडणवीसांवर उपमुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया

विधानसभेत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रश्न उपस्थित केला. याला देवेंद्र फडणवीसांनी उत्तर दिले आहे.

मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांना एका डिझायनर महिलेने एक कोटी रुपयांच्या लाच देण्याची ऑफर दिली होती. यावरुन सारखा त्रास दिला जात असल्याने अमृता फडणवीस यांनी डिझायनर महिलेच्या विरोधात मलबार हिल पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. याबाबत विधानसभेत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रश्न उपस्थित केला. याला देवेंद्र फडणवीसांनी उत्तर दिले आहे.

माझ्या कुटुंबास अडकवण्याचा प्रयत्न; अमृता फडणवीसांवर उपमुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया
महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर सुनावणी पूर्ण; सुप्रीम कोर्टानं निकाल राखून ठेवला

अनिल जयसिंघानी हा व्यक्ती फरार आहे. त्याची मुलगी अनिक्षा जयसिंघानी २०१५-१६ मध्ये अमृता फडणवीस यांना भेटत होती. २०२१मध्ये पुन्हा भेटीगाठी सुरु झाल्या. डिझायनर असल्याचे सांगून अनिक्षाने संपर्क केला होता. आई वारल्याचे सांगून तिने पुस्तक प्रकाशन करुन घेतले. अमृता यांचा विश्वास संपादन करून डिझायनर कपडे परिधान करण्यास दिले. यानंतर वडिलांना काही चुकीच्या प्रकरणात अडकवल्याचा दावा अनिक्षाने केला. यासाठी अमृता फडणवीसांना निवेदन देण्यास सांगत त्यांच्यावर दबाव आणला.

काही बुकींना आपण ओळखत असल्याचे अनिक्षाने सांगितले. मात्र, त्यासंदर्भात अमृता यांनी दुर्लक्ष केले. वडिलांना सोडवण्यासाठी १ कोटी रुपये देण्याचा आमिष दाखवले. परंतु, चुकीच्या प्रकारात मदत करणार नसल्याचे अमृता यांनी सांगितले. तसेच अनिक्षाचा नंबर ब्लॉक केला. अज्ञात नंबरवरून व्हिडीओ व क्लिप पाठवल्या. यात एक गंभीर व्हिडिओ पाठवला होता. यात एका बॅगेत पैसे भरल्याचा व्हिडिओ व दुसरी बॅग घरकाम करणाऱ्या महिलेला दिल्याचे दिसत होते. ही बाब अमृता यांनी मला सांगितली व त्यानंतर पोलिसांना माहिती दिली, असे फडणवीसांनी सांगितले.

फॉरेन्सिकमध्ये सर्व व्हिडिओ तपासले आहेत. त्यानंतर पोलिसांनी संबंधित आरोपीस जाळ्यात अडकवले. गुन्ह्यातून सुटण्यासाठी हा प्रकार केल्याचा सांगितले. संबंधित आरोपीने काही पोलीस अधिकारी व नेत्यांची नावे घेतली. मागील सरकारच्या काळात गुन्हे रद्द करण्यास सुरुवात केली होती. ते सरकार बदलल्याने थांबले. व केसेस परत घेतल्या तर उलट सांगू, असेही अनिक्षाने सांगितले. बातमी आल्यामुळे मुलगी व आरोपी दोघेही फरार आहेत.

मी वारंवार सांगत होतो मला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. मी सापडलो नाही तर कुटुंबास अडकवण्याचा प्रयत्न केला. काही लोक सांगत होते अनेक मोठ्या लोकांशी त्या आरोपीचा संबंध आहे. अनेक मोठे नेते आहेत. राजकारणात आपण कुठल्या पातळीवर चाललोय हे पाहावे लागेल, असा आरोप फडणवीसांनी अप्रत्यक्षपणे उध्दव ठाकरेंवर केला आहे.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com