Devendra Fadnavis : सुधीर मुनगंटीवारांची तोफ दिल्लीत धडाडणार, देवेंद्र फडणवीसांच चंद्रपुरातील भाषण

Devendra Fadnavis : सुधीर मुनगंटीवारांची तोफ दिल्लीत धडाडणार, देवेंद्र फडणवीसांच चंद्रपुरातील भाषण

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेधाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या उपस्थितीत नामांकन भरल्यानंतर जाहीर सभा घेण्यात आली.
Published by :
Dhanshree Shintre

गडचिरोलीत आज महायुतीचे उमेदवार म्हणून भाजपचे अशोक नेते यांचे नामांकन दाखल करण्यात आले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेधाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या उपस्थितीत नामांकन भरल्यानंतर जाहीर सभा घेण्यात आली. ही निवडणूक उमेदवारांची नसून मोदीजी विरूद्ध राहुल गांधी अशी आहे, तुम्हाला कोण हवंय, असा सवाल करत त्यांनी मोदीजींचे हात बळकट करण्यासाठी महायुतीच्या उमेदवारांना निवडून द्या, असे आवाहन केले.

या सभेत देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आज या ठिकाणी मंचावर उपस्थित असलेले आपले महाराष्ट्राचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेजी ज्यांचा फॉर्म भरण्याकरिता आपण सगळे एकत्र आलो आहोत. आपल्या चंद्रपूरची मूलूक मैदान तोफ आतापर्यंत मुंबईमध्ये धडधडत होती आता ती दिल्लीमध्ये धडधड करणार आहे असे आपले सुनील भाऊ मुनगंटीवार ज्यांनी 4 वेळा या चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचं नेतृत्व केलं आणि दिल्लीमध्ये अनेक घोटाळे बाहेर काढत देशाचे गृहराज्यमंत्री म्हणून अतिशय उत्तम काम केलं. ही राज्याची निवडणुक नाही आहे ही देशाची निवडणुक आहे. देशाचा नेता कोण असेल? देशाचं नेतृत्व कोणाच्या हाती द्यायचं? याची ही निवडणुक आहे. ही निवडणुक सुधीर भाऊ किंवा काँग्रेसचा उमेदवार यांच्यातली नाही तर ही निवडणुक हे ठरवणार आहे कि देशामध्ये मोदीजींच राज्य आणायचं की राहूल गांधीला संधी द्यायची याचा निर्णय करण्याची ही निवडणुक आहे. सुधीर भाऊला दिलेला प्रत्येक मत हे मोदीजींना दिलेलं मत आहे. काँग्रेसच्या उमेदवाराला दिलेलं मत हे राहूल गांधींना दिलेलं मत आहे.

राहूल गांधी हे एक यात्रा घेऊन निघाले. जिथे जिथे राहूल गांधी गेले तिथे काँग्रेस तुटली, फुटली लोकं सोडून गेले आणि निवडणूकीमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. आज देशामध्ये पहिल्यांदा कोणीतरी देशातील गरीव लोकांचा विचार केला, गरीब कल्याणाचा अजेंडा आणला, गरीबाला घर दिलं, शौचालय दिलं, पाणी दिलं, गॅस दिला, वीज दिली, लोन दिलं गरीबाला उभं केलं तुम्ही विचार करा जगाच्या इतिहासात जे झालं नाही ते मोदीजांनं करुन दाखवलं. 10 वर्षामध्ये 25 कोटी लोकांना गरीबाच्या बाहेर काढणारा नेता हा नरेंद्र मोदी आहेत.

मोदींजींचं सरकार मूठभर काम करणाऱ्या लोकांसारखं नाही आहे आणि म्हणूनच आज आपण पाहतोय महाराष्ट्रातील आपली युती भक्कम झाली आहे. सुधीर भाऊंनी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये विरोधी पक्षात असताना सरकारला सळो की पळो करुन सोडलं आणि सत्तेत आल्यानंतर सत्तेमध्ये काय परिवर्तणा आपण घडवू शकतो हे महाराष्ट्राच्या जनतेला दाखवून दिलं.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com