पवारसाहेब ...मीच माझा राजीनामा देतो; असं का म्हणाले फडणवीस?

पवारसाहेब ...मीच माझा राजीनामा देतो; असं का म्हणाले फडणवीस?

शरद पवार यांच्या राजीनामा नाट्यावरुन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार टोलेबाजी केली

पुणे : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या राजीनामा नाट्यावरुन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार टोलेबाजी केली आहे. टीआरपीमध्ये पवार साहेबाना मानलं पाहिजे. मीच माझा राजीनामा देतो, असा जोरदार टोला फडणवीसांनी शरद पवारांनी लगावला आहे. भाजप प्रदेश कार्यसमितीची बैठक आज पुण्यात पार पडत आहे. यावेळी पुरंदरचे माजी आमदार अशोक टेकवडे यांचा जेपी नड्डा यांच्या हस्ते भाजपात पक्ष प्रवेश करण्यात आला.

पवारसाहेब ...मीच माझा राजीनामा देतो; असं का म्हणाले फडणवीस?
बैलगाडा शर्यतीच्या निकालावर सुप्रीम कोर्टाचे आभार, मात्र... : बच्चू कडू

लोक माझे सांगाती हे एक पुस्तक आले आहे. त्यात एका पानात काही वाक्य लिहिले आहेत. वज्रमूठ सभेचे सर्वेसर्वा पवार साहेब यांनी उद्धव ठाकरे विषयी म्हंटलं आहे. उद्धव ठाकरेंबद्दल पवारांना काय वाटतं हे त्यांनी लिहिलं आहे. मी नाही सांगत आहे. आम्ही जेव्हा उद्धव ठाकरेंविषयी बोलत होतो तेव्हा आम्हालाच महाराष्ट्र द्रोही ठरवलं होते, असेही देवेंद्र फडणवीसांनी म्हंटले आहे.

तर, २०२३ चे शेवटचे सहा महिने आणि २०२४ चे पहिले सहा महिने आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचे असल्याचे सांगत फडणवीसांनी पुन्हा एकदा निवडणुकीचे संकेत दिले आहेत. ते म्हणाले की, कोणतीही लालसा मनात न बाळगता भाजपसाठी वेळ आपल्याला द्यायचा आहे. नवभारतासाठी मोदी यांना आपली साथ द्यायची आहे. पुढच्या एक वर्षात कुणाला काही मिळणार नाही? अध्यक्ष, समिती मागू नका, मंत्रीपद मागू नका. आपण मंत्रिमंडळ विस्तार करु, असेही त्यांनी म्हंटले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com