उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर; मनोज जरांगेंची भेट घेणार?

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर; मनोज जरांगेंची भेट घेणार?

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज संभाजीनगरच्या दौऱ्यावर आहेत.
Published by :
Siddhi Naringrekar

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज संभाजीनगरच्या दौऱ्यावर आहेत. छत्रपती संभाजीनगरच्या एका खाजगी रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यामुळे आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मनोज जरांगे पाटील यांची भेट घेणार का? हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.

छत्रपती संभाजीनगरच्या आयोध्या नगरी मैदानावर बागेश्वर धाम यांचे तीन दिवसीय कार्यक्रम आहे. त्यासाठी देवेंद्र फडणवीस येत आहेत. जेव्हा मनोज जरांगे उपोषणाला बसले होते. तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत अनेक नेत्यांनी भेट दिली. मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिली नव्हती.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com