फडणवीसांचा मलिकांना महायुतीत घेण्यास विरोध; थेट अजित पवारांना लिहीले खुले पत्र, म्हणाले...

फडणवीसांचा मलिकांना महायुतीत घेण्यास विरोध; थेट अजित पवारांना लिहीले खुले पत्र, म्हणाले...

नबाव मलिकांच्या निमित्तानं सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोपांचा कलगीतुरा पाहायला मिळाला. या पार्श्वभूमीवर फडणवीसांनी अजित पवारांना खुले पत्र लिहीले आहे.

मुंबई : नबाव मलिकांच्या निमित्तानं सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोपांचा कलगीतुरा पाहायला मिळाला. नवाब मलिक सत्ताधारी बाकांवर बसल्याचा मुद्दा विरोधकांनी विधान परिषदेत उपस्थित केला. या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिकांना महायुतीत घेण्यास विरोध केला आहे. यासाठी फडणवीसांनी अजित पवारांना खुले पत्र लिहीले आहे.

फडणवीसांचा मलिकांना महायुतीत घेण्यास विरोध; थेट अजित पवारांना लिहीले खुले पत्र, म्हणाले...
फडणवीसांचं वक्तव्य पाहून सरडेही आत्महत्या करतील; सुषमा अंधारेंचा हल्लाबोल

काय आहे देवेंद्र फडणवीस यांच्या पत्रात?

माजी मंत्री आणि विधानसभा सदस्य नवाब मलिक हे आज विधिमंडळ परिसरात येऊन कामकाजात सहभागी झाले होते. विधानसभा सदस्य म्हणून त्यांचा तो अधिकार सुद्धा आहे. त्यांच्याबाबत आमची वैयक्तिक शत्रुता अथवा आकस अजिबात नाही, हे मी प्रारंभीच स्पष्ट करतो. परंतु, ज्या पद्धतीचे आरोप त्यांच्यावर आहेत, ते पाहता, त्यांना महायुतीमध्ये घेणे योग्य ठरणार नाही, असे आमचे मत आहे, असे फडणवीसांनी म्हंटले आहे.

सत्ता येते आणि जाते. पण सत्तेपेक्षा देश महत्वाचा आहे. सध्या ते केवळ वैद्यकीय आधारावर जामीन मिळाल्याने बाहेर आहेत. त्यांच्यावरील आरोप सिद्ध न झाल्यास आपण त्यांचे जरूर स्वागत करावे. मात्र अशाप्रकारचे आरोप असताना त्यांना महायुतीचा भाग करणे, हे योग्य होणार नाही, असे आमचे स्पष्ट मत आहे. आपल्या पक्षात कोणाला घ्यायचे, हा सर्वस्वी आपला अधिकार आहे, हे मान्यच आहे. परंतु, त्यामुळे महायुतीला बाधा पोहोचणार नाही, याचा विचारही प्रत्येक घटक पक्षाला करावाच लागत असतो. त्यामुळे आमचा या गोष्टीला विरोध आहे.

त्यांना देशद्रोह्यांशी संबंध असल्याच्या आरोपाखाली अटक झाली तरी त्यांना मंत्रिपदावर कायम ठेवणाऱ्या तत्कालीन मुख्यमंत्री आणि महाविकास आघाडी सरकारच्या विचारांशी आम्ही सहमती दाखवू शकणार नाही. आपण आमच्या भावनांची नोंद घ्याल, अशी मला आशा आहे, असे फडणवीसांनी म्हंटले आहे.

दरम्यान, फेब्रुवारी 2022 मध्ये ईडीनं गोवावाला कंपाऊंड प्रकरणात मनी लाँड्रिंग कायद्याखाली नवाब मलिक यांना अटक केली होती. 11 ऑगस्टला सर्वोच्च न्यायालयानं मलिकांना मोठा दिलासा देत, वैद्यकीय कारणास्तव जामीन मंजूर केला. नवाब मलिक आज विधानसभेच्या कामकाजात सहभागी झाले. अधिवेशनात मलिक हे अजित पवार गटाच्या आमदारांसोबत बसतात, की शरद पवार गटाच्या आमदारांसोबत बसणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अशातच, मलिक सत्ताधारी बाकावर बसत अजित पवार गटात असल्याचे स्पष्ट केले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com