सत्यजीत तांबेंवर भाजपचा डोळा; थोरातांसमोरच फडणवीसांची खुली ऑफर

सत्यजीत तांबेंवर भाजपचा डोळा; थोरातांसमोरच फडणवीसांची खुली ऑफर

फडणवीसांचा डोळा आता कॉंग्रेसच्या नेत्यावर आहे. हे खुद्द देवेंद्र फडणवीसांनीच कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्यासमोर बोलून दाखविले आहे.

मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीनंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली आहे. एकनाथ शिंदेंनी देवेंद्र फडणवीसांबरोबर सत्ता स्थापन केली आहे. परंतु, फडणवीसांचा डोळा आता कॉंग्रेसच्या नेत्यावर आहे. हे खुद्द देवेंद्र फडणवीसांनीच कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्यासमोर बोलून दाखविले आहे. यामुळे राजकीय वर्तुळात सर्वांच्याच भुवया उंचावल्या असून उलट-सुलट चर्चा सुरु आहेत.

सत्यजीत तांबेंवर भाजपचा डोळा; थोरातांसमोरच फडणवीसांची खुली ऑफर
दिपाली सय्यद अन् राज्यपालांचे साटेलोटे; अनेकांना कोट्यवधींचा गंडा

कॅलिफोर्नियाचे गव्हर्नर गॅविन न्यूसम लिखित व सत्यजित तांबे यांनी मराठी अनुवाद केलेल्या 'सिटीझनविल' या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आज यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये पार पडला. या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते अजित पवार आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात हे एकाच व्यासपीठावर दिसून आले. या पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने देवेंद्र फडणवीसांनी जोरदार राजकीय फटकेबाजी केली.

सत्यजीत तांबेंवर भाजपचा डोळा; थोरातांसमोरच फडणवीसांची खुली ऑफर
कानडी बांधव आमचेच, पण...; संभाजीराजेंचा कर्नाटक सरकारला इशारा

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राजकारणात जे वेगळेपण असतं ते सत्यजीत यांच्यामध्ये दिसतं. ते बाहेरील देशात उच्च शिक्षणासाठी गेले. लोकशाहीमध्ये सर्व निर्णय राजकीय नेते घेत असतील, तर ते जेवढे प्रगल्भ असतील तेवढे चांगले निर्णय ते घेतील. सामान्य माणसांपेक्षा बाळासाहेब आपण हे पुस्तक वाचायला हवे. अशाप्रकारचे नेते आपण किती दिवस बाहेर ठेवणार आहात. जास्त दिवस बाहेर ठेवू नका. नाहीतर आमचाही डोळा त्यांवर पडतो. आम्हालाही अशी माणसं हवी असतात, असे म्हणत फडणवीसांनी सत्यजीत तांबे यांना खुली ऑफर दिली.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com