लोकसभा निवडणुकीबाबत धनंजय मुंडेंनी स्पष्टच सांगितले; दिल्ली माझ्यासाठी...

लोकसभा निवडणुकीबाबत धनंजय मुंडेंनी स्पष्टच सांगितले; दिल्ली माझ्यासाठी...

राज्यात सध्या लोकसभा निवडणुकीची चर्चा असून राजकीय पक्षांकडून तयारी सुरु करण्यात आली आहे.

विकास माने | बीड : राज्यात सध्या लोकसभा निवडणुकीची चर्चा असून राजकीय पक्षांकडून तयारी सुरु करण्यात आली आहे. यासाठी सर्वपक्षीयांकडून लोकसभेसाठी उमेदवारांची चाचपणीही सुरु झाली आहे. अशात, परळीत बॅनरवर संसद भवन लावल्यानंतर धनंजय मुंडेही लोकसभेच्या रिंगणात उतरणार या चर्चांना उधाण आले आहे. यावर आज बीड मध्ये आयोजित पत्रकार परिषदेत त्या चर्चेवर धनंजय मुंडे यांनी अखेर पडदा टाकला आहे.

लोकसभा निवडणुकीबाबत धनंजय मुंडेंनी स्पष्टच सांगितले; दिल्ली माझ्यासाठी...
नवं संसद भवन लोकशाहीचं नवं मंदिर; पंतप्रधान मोदींचं वक्तव्य

मी लोकसभा निवडणूक लढविणार नाही. एखाद्याला अर्धा ग्लास भरलेला दिसतो, कोणाला रिकामा दिसतो. लोकसभाचा उमेदवार म्हणून पक्षांनी माझ्यासोबत कसलीही चर्चा केली नाही. माझ्या दृष्टीने दिल्ली खूप दूर आहे. माझी लायकी लोकसभा लढविण्याची नाही. मी आणखीन खूप लहान आहे, असे सांगत धनंजय मुंडे यांनी तूर्तास तरी लोकसभा निवडणूक लढविणार नसल्याचे जाहीर केले आहे. दरम्यान, लोकसभा निवडणुकीत बीडमधून राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून येईल, असा विश्वासही मुंडे यांनी बोलून दाखविला आहे.

तसेच, लोकसभेची निवडणूक समोर आहे. आता धर्माधर्मात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होईल. ज्या देशावर मुघल आणि इंग्रजानी राज्य केलं. ज्या देशाची लोकसंख्या 130 कोटीच्या घरात आहे. त्यात बहुसंख्य हिंदू आहेत. मात्र आता निवडणूक समोर आल्यावर हिंदू खतरे मे है असे म्हणतील, असा निशाणा नेत्यांचे नाव न घेता धनंजय मुंडे यांनी भाजपवर साधला आहे. धर्माधर्मात तेढ निर्माण करून त्यांना लोकसभा निवडणूक जिंकायची असल्याचं देखील मुंडे यांनी म्हंटले आहे.

दरम्यान, शिंदे-फडणवीस सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार झाला. त्या मंत्रिमंडळ विस्तारात एकाही महिला नेत्याला स्थान देण्यात आलं नव्हतं. परंतु, दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तारात महिलांना स्थान देणार असल्याचे सांगण्यात आले होते. यात पंकजा मुंडेंची वर्णी लागण्याची चर्चा होती. मात्र, दुसऱ्या टप्प्यातही पंकजा मुंडे यांचे नाव नसल्याचे समजत आहे. यामुळे पंकजा मुंडे यांची यंदा दिल्लीत वर्णी लागणार का? असा प्रश्न आता उपस्थित करण्यात येत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com