Bharat Gogawale : छत्रपती शिवाजी महाराज सूरतला गेले होते म्हणून मी गेलो होतो

Bharat Gogawale : छत्रपती शिवाजी महाराज सूरतला गेले होते म्हणून मी गेलो होतो

शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर सुनावणी होती.
Published by :
Siddhi Naringrekar

शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर सुनावणी होती. यावेळी शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांना प्रश्न विचारण्यात आले.

भरत गोगावले यांना ६६ प्रश्न विचारले गेले. त्यावेळी भरत गोगावले यांनी उत्तरं दिली. ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांनी भरत गोगावले यांना प्रश्न विचारले. यावर भरत गोगावले यांनी मिश्किल उत्तरे दिली. भरत गोगावले यांच्या सुनावणीच्यावेळी एकच हशा पिकला. तुम्ही सुरतला कसे पोहचला आणि किती आमदार सोबत होते? यावर उत्तर देत गोगावले म्हणाले की, मी सुरतला गाडीने गेलो. मी माझ्या गाडीतून एकटाच गेलो.

त्यानंतर त्यांना प्रश्न विचारण्यात आला की, तुम्ही सूरतला का गेले असं भरत गोगावले यांना विचारण्यात आले. यावर उत्तर देताना भरत गोगावले म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज सूरतले गेले होते म्हणून मी गेलो होतो.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com