गारपिटीमुळे लग्नात आले विघ्न! नियोजित लग्नावर अवकाळी पावसाने सावट

गारपिटीमुळे लग्नात आले विघ्न! नियोजित लग्नावर अवकाळी पावसाने सावट

वाशिम जिल्ह्यात जोरदार वादळी वाऱ्यास दुपारच्या सुमारास जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारपीट झाली

गोपाल व्यास | वाशिम : जिल्ह्यात लग्नाची मोठी लगबग सुरू आहे. त्यातच आज दुपारच्या सुमारास जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारपीट झाली. यामुळे मानोरा तालुक्यातील चिखली येथील लग्न मंडळींची एकच धांदल उडाली. मंडपाचे देखील नुकसान झाले.

जिल्ह्यात आज दुपारपर्यंत चांगलेच ऊन तापले होते. परंतु, दुपार नंतर अचानक अनेक भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. मानोरा तालुक्यात जोरदार गारपीट झाली. तालुक्यातील चिखली येथे सुरू असलेल्या एका विवाह सोहळ्यावर गारपिटीने विघ्न आणले. विवाह सोहळा सुरू असताना अचानक वादळी पाऊस व गारपीट सुरू झाली. त्यामुळे वऱ्हाडी मंडळींची एकच ताळांबर उडाली.

तर लग्न मंडपात गारांचा खच साचला होता. यामधे मंडपाचे नुकसान झाले. वऱ्हाडी मंडळींनी पाणी पासून बचाव करण्यासाठी गाद्या घेऊन पळापळ केली. जिल्ह्यात लग्नाची एकच धामधूम असताना अवकाळी पावसामुळे मात्र सर्वत्र चिंतेचे वातावरण पसरले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com