Eknath Khadse : नामांतराबाबत शिंदेंचा क्रेडिट घेण्याचा प्रयत्न

Eknath Khadse : नामांतराबाबत शिंदेंचा क्रेडिट घेण्याचा प्रयत्न

एकनाथ खडसे यांची एकनाथ शिंदे यांच्यावर टीकास्त्र

जळगाव : शिंदे सरकारच्या (Shinde Government) मंत्रिमंडळाची बैठक आज झाली. या बैठकीत औरंगाबाद (Aurangabad), उस्मानाबाद (Osmanabad) शहराच्या नामांतराचा निर्णय घेण्यात आला. यावर आता विरोधकांकडून टीका करण्यास सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी नामांतराबाबत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा क्रेडिट घेण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका केली आहे.

Eknath Khadse : नामांतराबाबत शिंदेंचा क्रेडिट घेण्याचा प्रयत्न
Maharashtra Cabinet : औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजीनगर, उस्मानाबादचेही नामांतर

औरंगाबाद, उस्मानाबाद व नवी मुंबईच्या विमानतळाच्या नामांतराबाबत शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शेवटच्या कॅबिनेटमध्ये निर्णय घेतला होता. निर्णय घेतला असताना पुन्हा नव्याने निर्णय घेण्यापेक्षा एकनाथ शिंदे यांनी त्या निर्णयावर शिक्कामोर्तब केला असता. मात्र, केवळ एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. नामांतराबाबत क्रेडिट घेण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप एकनाथ खडसे यांनी केला आहे.

Eknath Khadse : नामांतराबाबत शिंदेंचा क्रेडिट घेण्याचा प्रयत्न
Shiv Sena Crisis : कोकणात- पालघरमध्ये शिवसेनेत बंडखोरी: खासदार, आमदार शिंदे गटात

तसेच, राजकारणामध्ये चिठ्ठी देण्याचे प्रकार हे चालत राहतात, कधी ते लवलेटर तर कधी प्रेमाची चिठ्ठी असते. तर कधी सूचना असतात. देवेंद्र फडणवीस यांना एकनाथ शिंदे यांच्या हाताखाली काम करण्याची एकनिष्ठ संधी त्यांच्या पक्षाने दिली आहे. त्यामुळे आपल्या अनुभवाचा फायदा मुख्यमंत्र्यांना व्हावा म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांना चिठ्ठीद्वारे सूचना केली असेल, असे मत व्यक्त करत खडसे यांनी देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे.

दरम्यान, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची गुरुवारी पत्रकार परिषद होती. यावेळी फडणवीस यांनी शिंदेंकडे एक चिठ्ठी सरकवली. हे दृष्य माध्यामांच्या कॅमेऱ्यांमध्ये कैद झाले होते. यावरुन विरोधकांनी तोंडसुख घेण्यास सुरुवात केली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com