
राज्यभरात मोठ्या उत्साहाने धुळवड साजरी होत आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही दरवर्षीप्रमाणे यंदाही आनंद आश्रमात धुळवड साजरी करत आहे.

आनंद दिघे यांच्या फोटोला रंग लावून शिंदेंनी धुळवडीला सुरुवात केली.

एकनाथ शिंदे यांनी कुटुंबियांसोबतही धुळवडीचा आनंद लुटला.

यावेळी एकनाथ शिंदे यांना ढोल वाजवण्याचा मोह आवरला नाही.

मुख्यमंत्र्यांनी सर्वांना धुळवडीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

सरकार शेतकऱ्यांसोबत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हंटले आहे.

तत्पुर्वी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कुटुंबियांसोबत होळी पेटवली.