....त्यामुळे मला निकालाचं काही टेन्शन नव्हतं; एकनाथ शिंदेंचे विधान

....त्यामुळे मला निकालाचं काही टेन्शन नव्हतं; एकनाथ शिंदेंचे विधान

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर सत्ताधारी व विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहे

संदीप शुक्ला | बुलढाणा : 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षच घेणार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. निकालानंतर सत्ताधारी व विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आम्ही जे-जे केलं ते अगदी कायदेशीर केले. घटनेच्या चाकोरीत राहून केलं, असे म्हंटले आहे. ते बुलढाणा जिल्ह्यातील इसरूळ येथे बोलत होते.

....त्यामुळे मला निकालाचं काही टेन्शन नव्हतं; एकनाथ शिंदेंचे विधान
निवडणूकीची खुमखुमी असेल तर राजीनामा द्याच आणि...; श्रीकांत शिंदेंचे ठाकरे गटाला आव्हान

गेली सात-आठ महिने काय होणार चर्चा सगळीकडे होती. पण, मी पांडुरंगाची पूजा करून आलो. त्यामुळे मला काही टेन्शन नव्हतं. आम्ही जे-जे केलं ते अगदी कायदेशीर केले. घटनेच्या चाकोरीत राहून केलं. लोकशाहीमध्ये बहुमताला महत्व असते. सर्वोच्च न्यायालयाने तुमच्या या भक्तांच्या बाजूने निकाल दिला. त्याचं स्वागत आपण सर्वांनी केले, असे एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.

संत परंपरेतून एक उदाहरण चोखूबा रायचा मंदिर येथे झालं आहे. परमेश्वराच्या भक्तीतून वारकरी परंपरा महाराष्ट्रासाठी अनमोल ठेवा आहे. हा ठेवा जपण्यासाठी आणि आणि पुढच्या पिढीकडे देण्यासाठी सरकार देखील संत विद्यापीठाची उभारणी देखील करणार आहे, अशी घोषणाही त्यांनी केली आहे. संत परंपरेच्या ओव्या-भजन यांचा अभ्यास होणं आणि नव्या पिढीकडे जाण गरजेचं आहे, असेही एकनाथ शिंदेंनी सांगितले.

दरम्यान, उध्दव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेत शिंदे गटावर जोरदार टीकास्त्र सोडले. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर काहींनी फटाके वाजवले. भाजपने फटाके वाजवले समजू शकतो पण गद्दारांनी फटाके का वाजवले कळत नाही? सर्वोच्च न्यायालयाने पोपट ठेवला आहे, तो मेलेला आहे. विधानसभा अध्यक्ष यांच्याकडे आता निर्णय आहे. महाराष्ट्राची बदनामी थांबली पाहिजे, असे त्यांनी म्हंटले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com