एकनाथ शिंदे राज्यपालांच्या भेटीला; चर्चांना उधाण

एकनाथ शिंदे राज्यपालांच्या भेटीला; चर्चांना उधाण

राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण

मुंबई : शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. यामुळे राजकारणात खळबळ उडाली असून वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहेत. अशातच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेण्यासाठी राजभवनावर दाखल झाले आहेत. यामुळे राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. मात्र, एकनाथ शिंदे स्नेहभोजनासाठी राजभवनावर गेले असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. तरी एकनाथ शिंदे-राज्यपालांच्या भेटीला महत्व प्राप्त झाले आहे.

एकनाथ शिंदे राज्यपालांच्या भेटीला; चर्चांना उधाण
मोठी बातमी! पुण्यातील DRDOच्या संचालकाला अटक; हनीट्रॅपमध्ये अडकून पाकला दिली माहिती

शरद पवारांनी राजीनामा दिल्यानंतर राष्ट्रवादी भाजपसोबत हातमिळवणी करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. यावर शिंदे गटाच्या नेत्यांच्या प्रतिक्रियाही समोर येत असून राष्ट्रवादी सत्तेत सहभागी झाल्यास स्वागतच, असे म्हंटले जात आहे. तर, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडूनही संकेत देण्यात येत आहे. अशातच, एकनाथ शिंदेंनी राजभवनावर राज्यपालांची भेट घेतली आहे. स्नेहभोजनासाठी शिंदे-बैस यांची भेट झाल्याची माहिती मिळत असली तरी सध्याच्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, वजीर निघून चालला होता म्हणून शरद पवारांनी राजीनामा दिला, असा दावा शिंदे गटाचे नेते महेश शिंदे यांनी केला आहे. 40 आमदार घेऊन वजीर गायब होणार आहे आणि तो होणारही आहे. पक्ष टिकवण्यासाठी त्यांना राजीनामा द्यावा लागला आहे. प्रत्येकाला मुख्यमंत्री व्हायचं आहे. राष्ट्रवादी पक्षात धुसफूस आहे हे अख्खा महाराष्ट्र पाहतोय. एका घरात 2 मुख्यमंत्री होणार कसे? हा मोठा प्रश्न निर्माण झालाय, असे सांगत पवारांच्या राजीनाम्यावर आमदार महेश शिंदेंनी खोचक टीका केली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com