एकनाथ शिंदे राज्यपालांच्या भेटीला; मराठा आरक्षणावर चर्चा?

एकनाथ शिंदे राज्यपालांच्या भेटीला; मराठा आरक्षणावर चर्चा?

कुणबी नोंदी सापडलेल्यांना कुणबी प्रमाणपत्र देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. मात्र, मनोज जरांगे पाटलांनी आम्ही अर्धवट आरक्षण घेणार नसल्याचे म्हंटले आहे.

मुंबई : कुणबी नोंदी सापडलेल्यांना कुणबी प्रमाणपत्र देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. मात्र, मनोज जरांगे पाटलांनी आम्ही अर्धवट आरक्षण घेणार नसल्याचे म्हणत आंदोलनावर ठाम आहेत. अशातच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्यपाल रमेश बैस यांच्या भेटीला राजभवनावर दाखल झाले आहेत.

एकनाथ शिंदे राज्यपालांच्या भेटीला; मराठा आरक्षणावर चर्चा?
मराठा आरक्षणासाठी एक दिवसीय विशेष अधिवेशन घ्यावे; मिटकरींची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

कुणबी असल्याचे पुरावे सापडले असतील, ज्यांना पुरावे त्यांना आरक्षण असे नाही तर सरसकट प्रमाणपत्र द्या, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. मी आंदोलन थांबवणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. राज्यातील सरसकट मराठयांना आरक्षण द्या, असा पुनरुच्चार पुन्हा एकदा जरांगे पाटलांनी केला आहे. तर, दुसरीकडे मराठा आंदोलक आक्रमक झाले आहेत. बीडमध्ये आंदोलकांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार संदीप क्षीरसागर, प्रकाश सोळंके यांचे घर आणि शरद पवार गटाचे कार्यालय जाळण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे हे राजभवन येथे राज्यपाल रमेश बैस यांच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत. या बैठकीत मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. यामुळे या बैठकीकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com