eknath shinde | BJP | Devendra Fadnavis
eknath shinde | BJP | Devendra Fadnavisteam lokshahi

नाराजीच्या चर्चेला केसरकरांकडून ब्रेक, पण भाजपचं पश्चिम महाराष्ट्रात गणित काय?

फडणवीस मुख्यमंत्री नसले तरी त्यांच्या निकटवर्तीय आमदारांना चांगल्या खात्याची जबाबदारी मिळणार का?
Published by :
Shubham Tate

Eknath Shinde : महाविकास आघाडी सरकार कोसळलं आणि राज्यात भाजप आणि शिवसेनेतील शिंदे गटाचं सरकार आलं. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मात्र, आता मंत्रिपदाच्या वाटपावरुन शिंदे गटात नाराजी आणि रस्सीखेच सुरु असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहेत. शिंदे गटातील आमदारा संजय सिरसाट यांना मंत्रिपद हवं आहे. मात्र, एकट्या औरंगाबाद जिल्ह्यात शिंदे गट 3 मंत्रिपद कसा देणार? असाही प्रश्न आहे. तसंच बच्चू कडू यांनीही कॅबिनेट मंत्रीपदाची मागणी केलीय. अशावेळी शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी माध्यमांसमोर येत मंत्रिपदावरुन नाराजीच्या सर्व बातम्या फेटाळून लावल्या आहेत. (eknath shinde ministerial post clear from deepak kesarkar)

दरम्यान, या सरकार मध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू सहकारी दौंड तालुक्याचे भारतीय जनता पार्टीचे आमदार राहुल कुल (MLA Rahul Kul) यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता वाढली आहे. आमदार राहुल कुल यांच्या रूपाने दौंड तालुक्याला पहिले मंत्रिपद मिळण्याची आशा दौंड तालुक्यातील जनतेला आहे. कुल फडणवीस यांचे अतिशय निकटवर्तीय म्हणून ओळख आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची धुरा स्वतःच्या खांद्यावरून न घेता एकनाथ शिंदे यांच्याकडे सोपवली आहे. नव्याने स्थापन होणाऱ्या मंत्रिमंडळात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री नसले तरी त्यांच्या निकटवर्तीय आमदारांना चांगल्या खात्याची जबाबदारी ते देणार आहेत अशी चर्चा आहे. यामुळे कुल यांच्या रूपाने दौंड तालुक्याला पहिला लाल दिवा मिळू शकतो अशी आशा दौंड तालुक्यातील जनता व्यक्त करत आहे.

eknath shinde | BJP | Devendra Fadnavis
पहिल्याचं बैठकीत मुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरेंना दणका

भोसरी विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले लांडगे पिंपरी-चिंचवड शहर आणि शिरूर लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या मजबुतीसाठी आवश्यक आहे. चिंचवडचे भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांची खालावलेली प्रकृती पाहता महेश लांडगेंवर पक्षाची जबाबदारी राहणार आहे.

eknath shinde | BJP | Devendra Fadnavis
मुख्यमंत्रिपद मिळालंय पण एकनाथ शिंदेंसमोर आहेत 'या' पाच अडचणी

तसेच माळशिरस मतदारसंघ राखीव झाल्याने तिथून भाजपचे राम सातपुते आमदार आहेत. त्यामुळे रणजितसिंह मोहिते पाटील यांना भाजपने विधानपरिषदेवर संधी दिली आहे. विजयसिंह मोहिते पाटील अनेक दशकांची शरद पवारांची साथ सोडून फडणवीसांच्या गोटात सामिल झाले आहेत. त्याचे बक्षीस रणजितसिंहाना मंत्रीपदाच्या स्वरुपात मिळू शकते.

पुण्यातील पर्वती विधानसभा मतदारसंघातून सलग तीनवेळा आमदार असलेल्या मिसाळ यांना मंत्रीपद देऊन पुण्याला प्रतिनिधित्व दिले जाऊ शकते.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com