अनिल देशमुखांच्या 'त्या' गौप्यस्फोटावर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया; म्हणाले, अडीच वर्षात...

अनिल देशमुखांच्या 'त्या' गौप्यस्फोटावर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया; म्हणाले, अडीच वर्षात...

लोकशाही मराठीच्या पॉडकास्ट विथ कमलेश सुतार या कार्यक्रमामध्ये अनिल देशमुख यांची मुलाखत झाली. या मुलाखतीमध्ये अनिल देशमुख यांनी मोठं गौप्यस्फोट केलं आहेत. यावर मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मुंबई : लोकशाही मराठीच्या पॉडकास्ट विथ कमलेश सुतार या कार्यक्रमामध्ये अनिल देशमुख यांची मुलाखत झाली. या मुलाखतीमध्ये अनिल देशमुख यांनी मोठं गौप्यस्फोट केलं आहेत. महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यासाठी भाजपने ऑफर दिली होती. त्यासाठी भाजपच्या वरिष्ठ नेत्याचा दूत माझ्याकडे आला होता. त्याची ऑडिओ आणि व्हिडीओ क्लिप माझ्याकडे असल्याचा दावा अनिल देशमुख यांनी केला. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

अनिल देशमुखांच्या 'त्या' गौप्यस्फोटावर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया; म्हणाले, अडीच वर्षात...
नवा कायदा निवडणूक आयोगाला गुलाम करणारा; प्रकाश आंबेडकरांचं टीकास्त्र

वरळीमध्ये एकनाथ शिंदेंनी स्वच्छता मोहिमेची पाहणी केली आहे. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधत अनिल देशमुखांच्या आरोपांवर प्रतिक्रिया दिली आहे. एकनाथ शिंदे म्हणाले की, गेले त्यांचं सरकार. त्यांच्या सरकारसोबत गेलं सर्व गेलं. त्यांच्या आरोपांना उत्तर देण्याची गरज नाही, अशा शब्दात त्यांनी उत्तर देण्याचे टाळले. तर, अडीच वर्षात झालेला कचरा आम्ही साफ करत आहे, असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला आहे.

काय म्हणाले होते अनिल देशमुख?

​माझ्यावर आरोप लावल्यावर काही भाजपचे नेते माझ्याकडे आले. माझ्याकडे त्यांनी चार मुद्द्यांचा एक कागद आणून दिला. काही लिहून द्यायला सांगितले, ते जर मी लिहून दिले असते तर उद्धव ठाकरे सरकार ३ वर्षांपूर्वी पडले असते. मी लिहून देण्यास नकार दिला, त्याच्या दुसऱ्या दिवशी सीबीआयची रेड झाली. मी लिहून दिलं असते तर अटकेचा प्रश्नच नव्हता. लिहून दिले असते तर मी मंत्री झालो असतो. ​जो व्यक्ती माझ्याकडे ड्राफ्ट घेऊन आला त्या व्यक्तीचे ऑडिओ आणि व्हिडिओ रेकॉडिंग आहे. जर मी काही मुद्दे सांगितले तर फार मोठा धमाका होईल, असे अनिल देशमुख यांनी म्हंटले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com