जुन्या पेन्शनबाबत कर्मचाऱ्यांच्या बैठकीत नेमके काय ठरले? मुख्यमंत्री शिंदेंनी सांगितले

जुन्या पेन्शनबाबत कर्मचाऱ्यांच्या बैठकीत नेमके काय ठरले? मुख्यमंत्री शिंदेंनी सांगितले

एकनाथ शिंदे यांनी विधानपरिषद आणि विधानसभेत निवेदनाद्वारे जाहीर केले
Published by  :
Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : जुनी पेन्शन योजना मागणीसाठी सरकारी कर्मचाऱ्यांनी अखेर सात दिवसांनी संप मागे घेतला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज संपकऱ्यांसोबत सकारात्मक बैठक घेतली. या बैठकीमध्ये नेमके काय चर्चा झाली निवेदन मुख्यमंत्र्यांनी सभागृहात सादर केले.

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतल्याच्या निर्णयाचे स्वागत केले असून कर्मचाऱ्यांच्या मागणीबाबत राज्य शासन पूर्णतः सकारात्मक असून याकरिता स्थापन करण्यात आलेल्या समितीचा अहवाल लवकरात लवकर प्राप्त करून त्यावर उचित निर्णय घेण्यात येईल, असे शिंदे यांनी म्हंटले आहे.

जुन्या पेन्शनबाबत कर्मचाऱ्यांच्या बैठकीत नेमके काय ठरले? मुख्यमंत्री शिंदेंनी सांगितले
Old Pension Scheme : सात दिवसानंतर सरकारी कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे

यासंदर्भात निवेदन करताना एकनाथ शिंदे म्हणाले की, राज्य सरकारी मध्यवर्ती संघटना व सर्व शासकीय, निमशासकीय कर्मचारी संघटनांच्या वतीने १४ मार्च, २०२३ पासून सरकारी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. तसेच, महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघ यांच्या वतीने देखील २८ मार्च, २०२३ पासून संपावर जाण्याबाबत राज्य शासनाला नोटीस दिलेली आहे. या संपावर तोडगा काढण्यासाठी आज मुख्य सचिव व माझ्या स्तरावर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली.

या बैठकीत राज्य शासनाने केलेल्या आवाहनाला कर्मचारी व राजपत्रित अधिकारी संघटनांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. बैठकीत संबंधित संघटनांनी संप मागे घेण्याचा निर्णय घेतला. राज्यासमोर असलेल्या आव्हानांचा विचार करता राज्य सरकारी, निमसरकारी कर्मचाऱ्यांनी संवेदनशीलतेने घेतलेल्या या निर्णयाचे मी स्वागत करतो, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. कर्मचाऱ्यांच्या मागणीबाबत राज्य शासन पूर्णतः सकारात्मक असून याकरिता स्थापन करण्यात आलेल्या समितीचा अहवाल लवकरात लवकर प्राप्त करून त्यावर उचित निर्णय घेण्यात येईल, असेही एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com