"बारामतीत परिवर्तन होणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ" - एकनाथ शिंदे

"बारामतीत परिवर्तन होणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ" - एकनाथ शिंदे

बारामतीकरांनी 15 वर्ष खासदार म्हणून निवडणून दिलं. परंतू आता अबकी बार सुनेत्रा ताई पवार.
Published by :
Dhanshree Shintre

Eknath Shinde: लोकसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. आज सुनेत्रा पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी महायुतीच्या सभेचे आयोजन करण्यात आले. यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले की, देवेंद्र फडणवीसजी म्हणाले ते बरोबर आहे या व्यासपीठावर एवढे मजबूत माणसं आहेत की 10-12 लाख मतं अशीच आणतील आणि सुनेत्रा ताईंना दिल्लीला पाठवतील. आज आपण पाहतोय की बारामतीमध्ये परिवर्तनाची आस आणि घड्याळाची लाट इथे आपण पाहतोय आणि खऱ्या अर्थाने बारामतीकरांनी परिवर्तन करायचं हा निर्धार केलेला आहे हा संकल्प केला आहे म्हणून बारामतीत अजित दादा परिवर्तन होणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेख आहे.

बारामतीकरांनी 15 वर्ष खासदार म्हणून निवडणून दिलं. परंतू आता लेकीन अबकी बार सुनेत्राताई पवार. कारण आता भाकरी फिरवायची वेळ आली आहे बरोबर फिरवा आणि म्हणून बारामतीची ही जी लढाई आहे ही ऐतिहासिक लढाई असली तरीसुद्धा ही वयक्तिक लढाई नाही ही विकास वाद विरुद्ध परिवार वाद अशी लढाई आहे. खरं म्हणजे या देशाला विकासापर्यंत नेणाऱ्या नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून या ठिकाणी अजित दादांनी महायुतीची साथ दिली आणि खऱ्या अर्थाने ही लोकसभेची निवडणूक आहे. एका मतदार संघापूरती मर्यादित नाही तर ही लोकसभेची निवडणुक असली तरी देशाची भवितव्य घडवणारी निवडणुक आहे.

देश बलशाली, विकसित आणि मजबूत भारत बनवणारी ही निवडणुक आहे आणि मोदींजीचे हात बळकट करणारी ही निवडणुक आहे. प्रत्येकाचं मतं आपल्याला महत्त्वाचं आहे आणि म्हणून महायुतीच्या प्रत्येक उमेदवाराचा विजय हा देखील महत्त्वाचा आहे. मी नेहमी मग्धे वाचत होतो बघत होतो ज्यांना लेकीत आणि सुनेत अंतर वाटते त्यांना मनातल्या मनात मंडे खाऊ द्या. कारण ज्यांच्या मनात मांडे त्यांच्या मनात धोंडे पडल्याशिवाय राहणार नाही.

पवार साहेबांचं बारामतीमध्ये विकासामध्ये त्यांचं योगदान कोणी अमान्य करणार नाही. परंतू अजित दादांनी गेले अनेक वर्ष जे काय काम केलं आहे, ज्यांची दूर दृष्टी आहे विकासाची दृष्टी आहे त्यांना खऱ्या अर्थाने बारामतीचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम कोणी केलं तर त्यांचं नाव आहे अजित दादा पवार आणि म्हणून जेव्हा जेव्हा संधी आली तेव्हा तेव्ही अजित दादांवर अन्यायच झाला. शेवटी सहनशीलतेचा अंत कुठेतरी असतो आणि अजित दादांनी मोदींजीवर विश्वास ठेवला. महायुतीच्या सरकारवर विश्वास ठेवला, विकासावर विश्वास ठेवला आणि या राज्यामध्ये उपमुख्यमंत्री म्हणून ते काम करु लागले.

मी आणि देवेंद्रजी हे सरकार पुढे नेत होतो. सरकारचा सर्वांगीण विकास चालू होता आणि त्यामध्ये अजित दादाच्या रुपाने एक पुन्हा भक्कम साथ या सरकारला मिळाली आणि महायुतीचं सरकार आणखी मजबूत झालं. मोदी साहेब म्हणाले होते की मी पवार साहेबांचं बोट धरुन राजकारण शिकलो पण पवार साहेबांचं बोट सोडल्यावर मोदीने या देशाचा कायापालट केला या देशाला विकासापर्यंत नेलं आणि अजित दादांनी सुद्धा शरद पवार साहेबांचं बोट आता सोडलेलं आहे. सुनेत्रा ताई आणि अजित दादा मिळून या बारामतीचा नक्की कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास आहे.

प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्री असते असं म्हणतात. खरं म्हणजे अजित दादांच्या मागे आपल्या सुनेत्रा ताईंचा खंबीर पाठिंबा आहे. त्यांची साथ आहे. त्या उद्योजक देखील आहेत. 18 वर्ष त्या बारामती हायटेक टेक्सटाईल पार्कच्या त्या अध्यक्ष आहेत. 15 हजारांपेक्षा जास्त महिलांना त्यांनी रोजगार मिळवून दिला आहे. आणि म्हणून सुनेत्रा ताईंचं वक्तृत्व देखील चांगलं आहे आणि त्यांचं कतृत्वही चांगलं आहे. त्यामुळे त्या उत्तम खासदार होतील यामध्ये कोणाच्याही मनामध्ये शंका असण्याचं काम नाही.

मी आपल्याला एवढेचं सांगतो 10 वर्षामध्ये एकही सुट्टी न घेता पूर्णपणे देशाला समर्पित करणारा प्रधानमंत्री आपल्याला लाभलेली आहे. नरेंद्र मोदी यांचा जन्म राजनितीसाठी नाही राष्ट्रनीतीसाठी झालेला आहे. प्राण जाये पर वचन ना जाये अशी भूमिका मोदींजींची आहे. देश भक्तीला त्यांना प्राधान्य दिलेला आहे. मग राम मंदिर असो 370 असो मोदींजींनी दिलेला प्रत्येक शब्द त्यांनी पाळलेला आहे. या देशाला महासत्ता बनवण्याचं वचन त्यांनी दिले आहे. हे वचन मोदीजी पूर्ण करतील याची गॅरंटी आहे ना तुम्हाला? नरेंद्र मोदी हे पंतप्रधान हवेत की राहूल गांधी हे पंतप्रधान हवेत असा प्रश्न जर तुम्ही कोणालाही विचारला तर त्याचं एकचं उत्तर येईल मोदी मोदी मोदी! या बारामतीमधून आपल्या सुनेत्रा ताई पवार यांना प्रचंड मताने विजयी करा. एवढे लोक जर आले यांनी 10-20 लोकांवडून 100 मतं गोळा केली तर मला वाटतं 7-8 मतं असेच मिळून जातील.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com