आदित्य ठाकरेंच्या दाव्यावर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...

आदित्य ठाकरेंच्या दाव्यावर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...

आदित्य ठाकरे यांच्या दाव्यावर राज्यातील राजकारण तापले असून सत्ताधाऱ्यांनी टीकेची झोड उठवली आहे. या

मुंबई : जेलच्या भीतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाजपबरोबर गेले, असा मोठा गौप्यस्फोट ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी केला आहे. यावरुन राज्यातील राजकारण तापले असून सत्ताधाऱ्यांनी आदित्य ठाकरेंवर टीकेची झोड उठवली आहे. यावर अखेर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया समोर आली आहे. आदित्य ठाकरे लहान असल्याचा निशाणा एकनाथ शिंदेंनी साधला आहे.

आदित्य ठाकरेंच्या दाव्यावर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
आदित्य ठाकरेंच्या दाव्यावर शिरसांटाचा खुलासा; एकनाथ शिंदे मातोश्रीवर गेले होते, मात्र...

काय म्हणाले होते आदित्य ठाकरे?

आदित्य ठाकरेंनी एका कार्यक्रमात एकनाथ शिंदे यांच्या बंडाबाबत गौप्यस्फोट केला. एकनाथ शिंदे यांनी तुरुंगाच्या भीतीने बंड केलं आहे. एकनाथ शिंदेंना केंद्रीय यंत्रणांकडून अटक होणार होती, म्हणून सध्याचे मुख्यमंत्री मातोश्रीवर येऊन रडले होते. जर भाजपसोबत गेलो नाही तर ते मला अटक करतील, असे एकनाथ शिंदे यांनी म्हंटल्याचे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

आदित्य ठाकरेंच्या दाव्याबाबत एकनाथ शिंदेंना विचारले असता त्यांचं जाऊ दे. आदित्य ठाकरे लहान असल्याचे म्हंटले आहे.

तर, कर्नाटक आणि बेळगावच्या विषयावर आम्ही वकिलांचे आणि तज्ञांची एक टीम तयार केली आहे. मोठे तज्ज्ञ वकील त्यात नेमण्याची सूचना दिलेली आहे. जे काय पुढे सर्वोच्च न्यायालयामध्ये तयारी करण्याची आवश्यकता आहे. त्यामध्ये स्वतः मी लक्ष घालत आहे, असेही त्यांनी सांगितले आहे.

दरम्यान, राज्यामध्ये एक नंबर विकास सुरु आहे. समृद्धी हायवेपासून मेट्रो काम सुरू आहे. बुलेट ट्रेनचे काम सुरू आहे. हे सर्व प्रकल्प वेगाने पूर्ण होत असून या सर्वांचा फायदा महाराष्ट्र आणि जनतेला पुढे होईल. तर, मोठ्या प्रमाणात गुंतवणूक राज्यात होणार असल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com