...अन्यथा नारळ देऊन घरी बसवू; एकनाथ शिंदेंचा अधिकाऱ्यांना इशारा

...अन्यथा नारळ देऊन घरी बसवू; एकनाथ शिंदेंचा अधिकाऱ्यांना इशारा

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज नालेसफाईची पाहणी केली.

मुंबई : पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज नालेसफाईची पाहणी केली. यादरम्यान अधिकाऱ्यांना अनेक महत्वपूर्ण सूचना केल्या आहेत. तर, कामे न झाल्यास नारळ देऊन घरी बसवू, असा इशाराही मुख्यमंत्री शिंदेंनी अधिकाऱ्यांना दिला आहे. दर पावसाळ्यात मुंबईकरांना पाणी तुंबण्यामुळे त्रास सहन करावा लागतो. त्रास दिलेल्यांना लोक निवडणुकीत धडा शिकवतील, असा निशाणाही एकनाथ शिंदेंनी उध्दव ठाकरेंवर साधला आहे.

...अन्यथा नारळ देऊन घरी बसवू; एकनाथ शिंदेंचा अधिकाऱ्यांना इशारा
पवारसाहेब ...मीच माझा राजीनामा देतो; असं का म्हणाले फडणवीस?

दर पावसाळ्यात मुंबईकरांना पाणी तुंबण्यामुळे त्रास सहन करावा लागतो. मुंबई २२०० किलोमीटरचे नाले आहेत. नाले व्यवस्थित साफ केलेत तर मुंबईकरांचा त्रास वाचू शकतो. त्यामुळे मी भेटी दिल्या आहेत. पालिका आयुक्तांना सूचना केल्या आहेत. पाणी तुंबणारे स्टॉप आयडन्टीफाय केले आहेत. नालेसफाई ४ फूट ऐवजी ५ फूट जा, अशा सूचना केल्या आहेत.

कॅरींग कॅपॅसिटी वाढवण्याच्या सूचना दिल्या आहेत. जास्तीचा गाळ काढण्याच्या सूचना दिल्या आहेत. संबंधित अधिकाऱ्यांना सांगितलंय जिथे पाणी तुंबतं तिथे यंत्रणा लावा. फ्लड गेटची सिस्टीम इथे केली गेली आहे. ही सिस्टीम आपण मिठी नदीत देखील लावली तर आपल्याला फायदा होऊ शकतो. पाणी न तुंबणे हे तुमचं यश असेल, अन्यथा नारळ देऊन घरी बसवू, असा इशारा एकनाथ शिंदेंनी दिला आहे.

नालेसफाई पाहाणी दौरा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन केलेला नाही, असे स्पष्टीकरणही त्यांनी दिले आहे. तर, आगामी निवडणुकीत भाजप-सेना युती म्हणून आम्ही लढवू. गेल्या २५ वर्षात लोकांचा त्रास वाचणार आहेत. निवडणुकीत लोकं त्रास दिलेल्यांना धडा शिकवेल, अशी टीका शिंदेंनी उध्दव ठाकरेंवर केली आहे.

दरम्यान, मुंबई महापालिकेत भ्रष्ट कारभार सुरु असून कंत्राटदारांना देण्यात येणारी ६०० कोटी रुपयांची आगाऊ रक्कम दिली, असा आरोप ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी केला होता. यावर एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. लोकायुक्तांनी चौकशी केलीच पाहिजे. लोकांचा पैसा लोकांसाठी वापरला पाहिजे. डिपॉजिटसंदर्भात अशाप्रकारे खोटे आरोप करत आहेत. ८८ कोटींच्या ठेवी आहेत, यात उलट वाढ झाली आहे. कंत्राटदाराला ६०० कोटी रुपये दिले हे खोटे आरोप आहेत, असे उत्तर शिंदेंनी दिले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com