शिवसेनेचा फैसला करणार आता निवडणूक आयोग; ठाकरे-शिंदेंना नोटीस

शिवसेनेचा फैसला करणार आता निवडणूक आयोग; ठाकरे-शिंदेंना नोटीस

Shivsena : निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे आणि उध्दव ठाकरे यांना नोटीस पाठविली आहे.

मुंबई : शिवसेना (Shivsena) एकनाथ शिंदेंची (Eknath Shinde) का उध्दव ठाकरेंची (Uddhav Thackeray) यातील नेमकी कोणाची यावरुन रस्सीखेच आता सुरु झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्रानंतर केंद्रीय निवडणूक आयोगही (Election Commission) आता अ‍ॅक्शन मोडवर आले आहे. निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे आणि उध्दव ठाकरे यांना नोटीस पाठविली आहे.

शिवसेनेचा फैसला करणार आता निवडणूक आयोग; ठाकरे-शिंदेंना नोटीस
गुगलने पुन्हा बदलले औरंगाबाद, उस्मानाबादचे नाव

शिवेसनेवर ताबा मिळवण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी जोर लावण्यास सुरुवात केली आहे. काही दिवसांपुर्वी दोन तृतीयांश आमदार, खासदार सोबत असल्याचे शिंदे यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र दिले होते. यामध्ये शिंदे गटाला शिवसेना म्हणून मान्यता द्या, अशी मागणी पत्रात केली होती. यावर आता निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांना नोटीस पाठविली आहे.

पक्षात बहुमत असल्याचे कागदोपत्री सिद्ध करा, अशी सूचनाच आयोगाने दोघांना केली आहे. 8 ऑगस्टला दुपारी 1 पर्यंत कागदपत्रे सादर करण्याचे आदेश निवडणुक आयोगाने असून दोन्ही बाजूची निवेदने पाहून आयोग सुनावणी घेणार आहे.

दरम्यान, शिवसेना आमदारांनंतर खासदारांचाही पाठिंबा मिळवण्यात एकनाथ शिंदे यांना यश आले. यामुळे शिंदे गटाचे बळ वाढले असून स्थानिक पातळीवरुनही शिंदेंना मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे. या फुटीचा शिवसेनेनंतर युवा सेनेलाही मोठा फटका बसत आहे. महाराष्ट्रात प्रथमच युवासेनात फूट पडली असून युवा सेनेचे 80 पदाधिकारी आणि 200 युवा सैनिक शिंदे गटात सहभागी झाले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com