'त्या' विधानामुळे राहुल गांधी अडचणीत! निवडणूक आयोगाने पाठवली नोटीस

'त्या' विधानामुळे राहुल गांधी अडचणीत! निवडणूक आयोगाने पाठवली नोटीस

काँग्रेस नेते राहुल गांधी यांना आज निवडणूक आयोगाकडून नोटीस पाठविण्यात आली आहे. आयोगाने त्यांना कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे.

नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांना आज निवडणूक आयोगाकडून नोटीस पाठविण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात केलेल्या विधानांवरुन ही नोटीस बजावली आहे. आयोगाने त्यांना कारणे दाखवा नोटीस पाठवली असून शनिवारी सायंकाळी ६ वाजेपर्यंत उत्तर देण्यास सांगितले आहे.

'त्या' विधानामुळे राहुल गांधी अडचणीत! निवडणूक आयोगाने पाठवली नोटीस
31 डिसेंबरला शिंदे सरकार पडणार म्हणजे पडणारच; आदित्य ठाकरेंचा दावा

भाजपने राहुल गांधी यांच्याविरोधात निवडणूक आयोगात तक्रार दाखल करून कारवाईची मागणी केली होती. पक्षाचे सरचिटणीस राधामोहन दास अग्रवाल आणि आणखी एक अधिकारी ओम पाठक यांच्यासह शिष्टमंडळातील इतर नेत्यांनी राहुल गांधींचे वक्तव्य अपमानास्पद असल्याचे म्हटले होते. यानंतर निवडणूक आयोगाकडून राहुल गांधींना नोटीस बजावण्यात आली.

काय म्हणाले होते राहुल गांधी?

विश्वचषक क्रिकेटच्या अंतिम सामन्यात भारतीय क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलियाकडून पराभव झाल्यानंतर राहुल गांधींनी निशाणा साधला होता. आपला संघ चांगल्या पद्धतीने वर्ल्ड कप जिंकले असते. पण तिथं पणवतीने हरवून टाकलं, असं राहुल गांधी यांनी म्हंटले होते. त्यांच्या या विधानाने जनसमुदायात एकच हशा पिकला. परंतु, या विधानाने आता राहुल गांधींच्या अडचणीत वाढ होणार आहे.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com