राजकारण
जळगावमधील ठाकरेंच्या सभेत रिकाम्या खुर्च्या; शिवसैनिकांनी फिरवली पाठ
उद्धव ठाकरे यांचं भाषण सुरू व्हायच्या काही वेळ आधी मैदानातल्या 50 टक्के खुर्च्या काही काळ रिकाम्या
शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आज जळगावमधील पाचोरा येथे जाहीर सभा पार पडली. दरम्यान, शिंदे गटात आणि ठाकरे गटात सभेआधी झालेल्या वादामुळे ही सभा चांगलीच चर्चेत आली होती. या सभेत गर्दी जमण्यावरून दोन्ही गटात शाब्दिक वाद पाहायला मिळाला. परंतु, याच सभेत खुर्च्या रिकाम्या असल्याचं दृश्य समोर आलं आहे. उद्धव ठाकरे यांच्या सभेतील रिकाम्या खुर्च्यावरून राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.