राहुल गांधींना फेसबुकची नोटीस; ‘तो’ व्हिडिओ त्वरित काढून टाकण्याची सूचना

राहुल गांधींना फेसबुकची नोटीस; ‘तो’ व्हिडिओ त्वरित काढून टाकण्याची सूचना

Published by :

नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राइट्स (एनसीपीसीआर) कडून समन्स मिळाल्यानंतर फेसबुकने मंगळवारी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना लिहिले की त्यांना इन्स्टाग्रामवरील एक पोस्ट डिलीट करण्याची विनंती केली आहे. त्यानंतर आता फेसबुकने काँग्रेस नेते राहुल गांधी यांना नोटीस बजावली आहे. या व्हिडिओमधून बलात्कार पीडित मुलीच्या पालकांची ओळख उघड झाल्याचे सांगण्यात आलं होते.

एनसीपीसीआरने यापूर्वी फेसबुकला पत्र लिहून सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर राहुल गांधी यांच्या विरोधात कारवाई करण्यास सांगितले होते. तीन दिवसांनंतर, १३ ऑगस्ट रोजी, त्यांनी फेसबुकला समन्स जारी केले. नोटीसला कोणताही प्रतिसाद न दिल्याने त्यांना प्रत्यक्ष उपस्थित राहण्यास सांगितले. त्यानंतर कारवाई करत फेसबुकने राहुल गांधी यांना मेल केला आणि फोटो काढून टाकण्यास सांगितले. जेव्हा फेसबुकने राहुल गांधी यांना एनसीपीसीआरला मेलची प्रत पाठवली, तेव्हा बाल हक्क समितीने त्यांना समन्समधून सूट दिली.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com