मुंबई आग्रा महामार्गावर पळासनेर गावाजवळ भीषण अपघात; 5 जणांचा मृत्यू

मुंबई आग्रा महामार्गावर पळासनेर गावाजवळ भीषण अपघात; 5 जणांचा मृत्यू

मुंबई आग्रा महामार्गावर पळासनेर गावाजवळ भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

मुंबई आग्रा महामार्गावर पळासनेर गावाजवळ भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. ब्रेक फेल होऊन कंटेनर एका हॉटेलमध्ये शिरल्यामुळे भीषण अपघात झाला. या अपघातात 5 जणांचा चिरडून जागीच मृत्यू झाला आहे.

एक कंटेनर महामार्गावरुन जात असताना त्याचा ब्रेक फेल झाला आणि तो थेट हॉटेलमध्ये शिरला. या भीषण अपघातात 5 जणांचा जागीच मृत्यू झाला असून 15 ते 20 जण जखमी झाले आहेत. पोलीस घटनस्थळी दाखल झाले असून मृतांची संख्या आणखी वाढण्याची भिती व्यक्त केली जात आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com