ओबीसी नेते माजी आमदार प्रकाश शेंडगे यांच्यावर गुन्हा दाखल करा; कोणी केली मागणी?

ओबीसी नेते माजी आमदार प्रकाश शेंडगे यांच्यावर गुन्हा दाखल करा; कोणी केली मागणी?

ओबीसी नेते माजी आमदार प्रकाश शेंडगे यांच्यावर गुन्हा दाखल करा.
Published by :
Siddhi Naringrekar

ओबीसी नेते माजी आमदार प्रकाश शेंडगे यांच्यावर गुन्हा दाखल करा. अशी मागणी करण्यात येत आहे. दोन समाजामध्ये तेढ निर्माण करणारे वक्तव्य करणारे ओबीसी नेते माजी आमदार प्रकाश शेंडगे यांच्यावर गुन्हा दाखल करा अशी मागणी समस्त सकल मराठा समाजाच्या वतीने पोलीस प्रमुखांकडे करण्यात आली.

मराठा समाजाला अप्रत्यक्ष धमकवण्याचे काम करीत असल्याने त्यांच्यावर दोन समाजात तेढ निर्माण करणारे वक्तव्य केल्याबद्दल गुन्हा दाखल करावा अशी मागणी मराठा समाजाकडून निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

यावेळी शरद देशमुख, अभिजीत पाटील, भरत बर्गे, सुहास पाटील, विजय साळुंखे यांच्यासह मराठा समाजाचे पदाधिकारी उपस्थित होते.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com