Politics | sports | entertainment
Politics | sports | entertainmentteam lokshahi

राजकारण, क्रीडा अन् मनोरंजन विश्वात काय घडलं दिवसभरात, लोकशाहीच्या माध्यमातून एका क्लिकवर जाणून घ्या

वाचा कोणत्या वस्तू वापरल्यास होणार कारवाई

बाळासाहेब ठाकरेंचं नाव आणि फोटो वापरण्याचा शिंदे गटाला पूर्ण अधिकार; अॅड. असीम सरोदेंनी सांगितला कायदा

शिंदे गटाला बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो वापरता येवू शकतो. बाळासाहेब ठाकरे हे एकाच कुटुंबाची संपत्ती नाही. असा कुठलाही कायदा नाही, ज्यामुळे बाळासाहेबांचा फोटो वापरण्यास बंदी घालता येणार, असे स्पष्ट मत अॅड. असीम सरोदे यांनी मांडले आहे. ते पुण्यात बोलत होते. सध्या राज्यात शिवसेनेतील बंडखोर नेते आणि शिवसेनेची झालेली अवस्था तसेच धनुष्यबाण आणि बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो या सर्वांवरून राजकारण सुरू आहे. शिवसेनेतील बंडखोर नेते सातत्याने बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा, फोटोचा वापर करीत आहेत. तर शिवसेनेतर्फे त्याला आक्षेप घेतला जात आहे. उद्धव ठाकरे यांनीही आपल्या मुलाखतीतून बंडखोरांना इशारा दिला आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या फोटोऐवजी स्वत:च्या आई-वडिलांचा फोटो वापरण्याचे म्हटले आहे. यासंबंधी कायद्याच्या दृष्टीकोनातून सरोदे बोलत होते.

राज्यात सिंगल युज प्लास्टिकला बंदी, वाचा कोणत्या वस्तू वापरल्यास होणार कारवाई

प्लास्टिक लेपीत आणि प्लास्टिकचा थर असलेल्या उत्पादनांवर बंदीचा महत्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. राज्यातील प्लास्टिकच्या वापरामुळे निर्माण होणाऱ्या गंभीर समस्या लक्षात घेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्लास्टिक बंदी नियमामध्ये सुधारणा करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.

Politics | sports | entertainment
IND VS WI : टीम इंडियाचा हा दिग्गज खेळाडू 3 टी20 मॅंचपासून बाहेर, आता खेळणार...

Govinda : करणवर गंभीर आरोप लावत गोविंदा म्हणाला....

बॉलिवूड अभिनेता गोविंदा (Govinda) याची एक जुनी मुलाखत सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये त्याने करण जोहर (Karan Johar) याला जेलेस आणि धोकादायक म्हटलं होतं. खरं तर चित्रपट निर्माता डेव्हिड धवन (Devid Dhawan) आणि गोविंदा यांची जोडी एकेकाळी खूप प्रसिद्ध होती. मात्र काही काळानंतर त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला. आता जुन्या मुलाखतीत गोविंदाने चित्रपट निर्माता करण जोहरवरही निशाणा साधला आहे.

संवादादरम्यान त्याने करणची तुलना डेव्हिड धवनशी केली होती. गोविंदाने करणला सत्य सांगितले जेव्हा गोविंदाला विचारण्यात आले की तो 'कॉफी विथ करण' वर जाणार का यावर त्याने उत्तर दिलं की जर तो त्याच्या शोमध्ये माझ्याशी बोलला तर तो सन्मान असेल. तो दाखवतो की तो खूप नम्र आणि निष्पाप आहे. पण तो डेव्हिडपेक्षा जास्त मत्सरी आणि धोकादायक आहे.

मी फिक्स मॅच पाहत नाही; फडणवीसांचा उध्दव ठाकरेंना टोला

मुंबई : महाराष्ट्रातल्या सत्तानाट्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत (Sanjay Raut) यांना मुलाखत दिली. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मी फिक्स मॅच पाहत नाही, अशी टीका त्यांनी केली आहे.

उध्दव ठाकरेंनी मुलाखतीत महाराष्ट्रातील सरकार का पडले, कसे पडले इथपासून ते उद्याच्या शिवसेनेच्या भवितव्यापर्यंतच्या सर्व प्रश्नांना रोखठोक उत्तरं दिली. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मी फिक्स मॅच पाहत नाही. लाईव्ह मॅच पाहत असतो, असा टोला उध्दव ठाकरेंना लगावला आहे.


ठाकरे सरकारचा आणखी एक निर्णय फिरवला, 59 हजार 610 कोटींच्या विकासकामांवर बंदी

State government : महाराष्ट्र राज्य सरकारने उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारच्या आणखी एका मोठ्या प्रकल्पावर बंदी घातली आहे. राज्यातील नवनिर्वाचित सरकार अस्तित्वात येऊन एक महिना होत आला आहे. आतापर्यंत, नवीन सरकारने महाराष्ट्रातील 'आपत्कालीन पेन्शन योजना' बंद करण्यासह MVA सरकारचे अनेक मोठे निर्णय उलटवले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, राज्य सरकारने महाराष्ट्र पर्यटन विभागाची ५९ हजार ६१० कोटींची विकासकामे लांबणीवर टाकण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. यापूर्वी सामाजिक न्याय विभागाची 600 कोटींची विकासकामे, दलित-आदिवासी समाजाची 1200 कोटींची शैक्षणिक व आर्थिक विकास कामे थांबवण्यात आली होती.


उद्धव ठाकरेंनी माझीही सुपारी दिली होती, देशाबाहेरच्या गँगस्टर...; नारायण राणेंचे गंभीर आरोप

केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी आज पत्रकार परिषद घेऊन उद्धव ठाकरे यांच्या सामनातील मुलाखतीवर निशाणा साधला. मुख्यमंत्री होते तेव्हा उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) हिंदुत्व, मराठी माणूस आठवला नाही, आता मात्र ते सविस्तर भावना व्यक्त करत आहेत. मात्र सत्ता गेल्यानंतर होणारा हा जळफळाट आहेत, ते मुख्यमंत्री पद गेल्यानं व्याकूळ झाले आहेत. ते म्हणतायेत पद गेल्याचं मला दु:ख नाही. मात्र मी उद्धव ठाकरेंना फार पुर्वीपासून ओळखतो. ते प्रचंड कपटी, दृष्ट बुद्धी असलेला तो माणूस आहे.

आता मुलाखतीत सांगत आहेत की, मी आजारी होतो, माझं ऑपरेशन झालं, मी शुद्धीवर नसताना सरकार पाडलं असं ठाकरे म्हणत आहेत. मात्र ते शिवसैनिक होते, त्यांनीच सत्ता आणली. उद्धव ठाकरेंशी ज्यावेळी त्यांचं जमलं नाही, उद्धव ठाकरे पक्षपात करायचे, त्यामुळे शिवसैनिकांनी वेगळा गट स्थापन केला. राणे संजय राऊत यांच्यावर आरोप करताना म्हणाले, संजय राऊत आनंदात आहेत. गुरु शरद पवार यांनी दिलेलं काम संजय राऊतांनी (Sanjay Raut) पूर्ण केलं आहे. संजय राऊतांनी सरकार पाडून पहिलं काम केलं, त्यानंतर आता जखमेवर मीठ चोळण्याचं काम आता ते करत आहेत. (आणखी वाचण्यासाठी येथे क्लिक करा)

Politics | sports | entertainment
Droupadi Murmu Lifestyle : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आपली दोन मुलं आणि पती गमावलाय.., अशी आहे त्यांची जीवनशैली

मीरा- भाईंदर, औरंगाबादसह 9 मनपाची आरक्षण सोडत 5 ऑगस्टला

औरंगाबाद, लातूर, परभणी, चंद्रपूर, भिवंडी- निजामपूर, मालेगाव, पनवेल, मीरा- भाईंदर व नांदेड- वाघाळा या 9 महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 5 ऑगस्ट 2022 रोजी आरक्षित जागांची सोडत काढण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने आज दिले. (आणखी वाचण्यासाठी येथे क्लिक करा)


टीम मधून वगळलं म्हणून उमरान मलिक शांत बसलेला नाही, पुढचं लक्ष्य आशिया कप

IPL 2022 मधील दमदार प्रदर्शनामुळे जम्मू एक्स्प्रेस उमरान मलिकला आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये संधी मिळाली. दक्षिण आफ्रिका, आयर्लंड आणि इंग्लंड विरुद्धच्या टी 20 सीरीजसाठी त्याची टीम इंडियात निवड झाली. त्याला तीन सामन्यात संधी सुद्धा मिळाली. पण त्याला अपेक्षित प्रभाव पाडता आली नाही. त्यामुळे वेस्ट इंडिज विरुद्धच्या पाच टी 20 सामन्यांसाठी त्याला संघातून वगळण्यात आलं. आता मिळालेल्या ब्रेक मध्ये उमरान मलिक जम्मू काश्मीर क्रिकेट असोशिएशनच्या मल्टी-डे कप स्पर्धेत खेळणार आहे. पुढच्या महिन्यात होणाऱ्या आशिया कप 2022 स्पर्धेत संघात स्थान मिळवण्यासाठी त्याचा प्रयत्न असेल. काश्मीरचा दुसरा क्रिकेटपटू अब्दुल समदही या स्पर्धेत खेळताना दिसणार आहे.

धनुष्यबाणावरील दावा : निवडणूक आयोगाविरोधात मागितली दाद; शिवसेनेच्या याचिकेवर 1 ऑगस्टला सुनावणी

शिवसेना पक्षावर कोणाचा दावा खरा आहे, हे पाहण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission Of India) शिवसेना (Shivsena) आणि शिंदे गटाला (Eknath Shinde) नोटीस बजावली होती. दरम्यान शिवसेनेची निवडणूक आयोगाविरोधातील याचिका सुप्रीम कोर्टाने स्वीकारली आहे. 1 ऑगस्टला याचिकेवर सुनावणी होणार आहे. न्यायालयातील आमदारांच्या अपात्रतेचं प्रकरण प्रलंबित निकाली निघेपर्यंत निवडणूक आयोगाने पक्षाची मान्यता आणि चिन्हाबाबत कोणताही निर्णय देऊ नये, अशी मागणी शिवसेनेने केलेल्या याचिकेत करण्यात आली आहे. शिवसेनेनं याचिकेत नेमकं काय म्हटलं आहे? काय आहे प्रकरण (आणखी वाचण्यासाठी येथे क्लिक करा)

लक्षात ठेवा! याच पालापाचोळ्यांनी इतिहास घडवलाय; मुख्यमंत्री शिंदेंचं मोजक्याच शब्दात उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची दैनिक सामनात प्रदीर्घ मुलाखत छापून आली आहे. या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी शिंदे गट आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. तसेच शिंदे गटाच्या आमदारांची तुलना पालापाचोळ्याशी केली आहे. गेला तो पालापाचोळा आहे. तो उडून गेल्याशिवाय राहणार नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. उद्धव ठाकरे यांच्या या विधानाचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापासून भाजप आणि शिंदे गटातील नेत्यांनी खरपूस समाचार घेतला आहे.

केंद्रीय सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी तर उद्धव ठाकरेंची ही मुलाखत बोगस असल्याचा दावा केला आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही उद्धव ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. शिंदे यांनी अत्यंत मोजक्याच शब्दात उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. लक्षात ठेवा, याच पालापाचोळ्यांनी इतिहास घडवलाय, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com