First video of 12 NCP Workers after getting bail along with Jitendra Awhad
First video of 12 NCP Workers after getting bail along with Jitendra AwhadTeam Lokshahi

आव्हाडांसह त्या 12 कार्यकर्त्यांनाही जामीन! पाहा 12 जणांचा पोलिस स्टेशनबाहेरील पहिला व्हिडीओ

हर हर महादेव यां चित्रपटाचा शो बंद पाडून प्रेक्षकाला मारहाण केल्याप्रकरणी जितेंद्र आव्हाड व त्यांच्यासह अन्य 12 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं.

संभाजीराजे छत्रपती यांनी या चित्रपटावर आक्षेप घेतल्यानंतर या चित्रपटावरून राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडताना दिसत आहेत. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी ठाण्याच्या विवियाना मॉलमध्ये सुरु असलेला हर हर महादेव चित्रपटाचा शो बंद पाडला होता. यावेळी एका प्रेक्षकाला मारहाण करण्यात आली होती. त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अविनाश जाधवांनी हा शो पुन्हा सुरू करायला लावला होता. दरम्यान, आव्हाड यांनी केलेल्या मारहाण प्रकरणी पोलिसांनी काल आव्हाडांना अटक केली होती. त्यांच्यासह राष्ट्रवादीचे माजी खासदार आनंद परांजपे यांच्यासह 11 कार्यकर्त्यांना अटक केली होती. आज 15 दिवसांची न्यायलयीन कोठडी सुनावल्यानंतर आता या सर्वांना जामीन मंजूर करण्यात आला आहे.

Lokshahi Marathi
www.lokshahi.com