महाराष्ट्रात होणार पहिल्या महिला मुख्यमंत्री? उद्धव ठाकरे यांनी दिले संकेत

महाराष्ट्रात होणार पहिल्या महिला मुख्यमंत्री? उद्धव ठाकरे यांनी दिले संकेत

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी एका कार्यक्रमात महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्रीविषयी संकेत दिले आहे. यामुळे राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी एका कार्यक्रमात महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्रीविषयी संकेत दिले आहे. यामुळे राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. याआधीही अनेकदा महिला मुख्यमंत्र्यांच्या चर्चांना उधाण आले होते. परंतु, उध्दव ठाकरे यांच्याकडून संकेत मिळाल्याने महत्व प्राप्त झाले आहे.

महाराष्ट्रात होणार पहिल्या महिला मुख्यमंत्री? उद्धव ठाकरे यांनी दिले संकेत
एमपीएससीने निवडलेल्या १११ उमेदवारांच्या नियुक्तीला उच्च न्यायालयाची स्थगिती

आद्यक्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी केलेल्या एका वक्तव्यानं महाराष्ट्रात नव्या चर्चेला तोंड फोडले आहे. शिवशक्ती, भीमशक्ती लहुशक्तीचा एक कर्तबगार माणूस मग ती महिला असेल किंवा पुरुष असेल, आपल्याला मुख्यमंत्रिपदी बसवायचा, असे उद्धव ठाकरे यांनी म्हंटले आहे. त्यानंतर मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतील महिला कोण? ही चर्चा सुरु झाली आहे. यामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे, भाजप नेत्या पंकजा मुंडे याशिवाय उध्दव ठाकरे पुन्हा एकदा सत्तेत आले तर रश्मी ठाकरे या मुख्यमंत्री पदावर विराजमान होऊ शकतात.

महाराष्ट्रात होणार पहिल्या महिला मुख्यमंत्री? उद्धव ठाकरे यांनी दिले संकेत
एकनाथ शिंदे प्लॅनिंग करण्यात हुशार; रामदास आठवलेंचे वक्तव्य

महिला मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत सर्वात आधी नाव राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची कन्या सुप्रिया सुळे यांचे येतं आहे. मागील 15 वर्षापासून सुळे राष्ट्रीय व राज्यातील राजकारणात सतत सक्रीय आहेत. तर, मी जनतेच्या मनातील मुख्यमंत्री, असे पंकजा मुंडे यांनी जाहीरपणे सांगितले होते. परंतु, जेव्हापासून त्यांनी महत्वकांक्षा जाहीर केली, त्यानंतर भाजपमध्ये त्यांना डावलले जात असल्याची भावना मुंडे समर्थक व्यक्त करत आहेत. शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांचे नाव अधूनमधून चर्चेत असते. त्या सक्रिय राजकारणात नसल्या तरी राजकारणावर त्यांचा प्रभाव असल्याचे म्हटले जाते. उद्धव ठाकरे आजारी असताना रश्मी ठाकरेंच्या नावाची चर्चा होती.

महाराष्ट्रात होणार पहिल्या महिला मुख्यमंत्री? उद्धव ठाकरे यांनी दिले संकेत
ये बुढा सठीया गया है; संजय गायकवाडांची खैरेंवर टीकास्त्र

दरम्यान, महाराष्ट्रात आजवर 19 मुख्यमंत्री होऊन गेलं. एकनाथ शिंदे विसावे मुख्यमंत्री आहेत. पण, या सर्वोच्च पदासाठी महिलांना महाराष्ट्रात संधी मिळालेली नाहीय. यामुळे आता उद्धव ठाकरे खरंच महिला मुख्यमंत्री बसवणार का? ही चर्चा रंगू लागलीय.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com