कुख्यात गुंडाचा भाजपात प्रवेश! हत्या, तडीपारसारखे तब्बल 11 गुन्हे दाखल

कुख्यात गुंडाचा भाजपात प्रवेश! हत्या, तडीपारसारखे तब्बल 11 गुन्हे दाखल

सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत एका शानदार सोहळ्यात केला भाजपात प्रवेश

अनिल ठाकरे | चंद्रपूर : राज्यात अभूतपूर्व राजकीय घडामोडी घडताना पाहायला मिळत आहेत. निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर अनेक जण वेगवेगळ्या पक्षात प्रवेश करत आहेत. परंतु, चंद्रपूर शहरातील कुख्यात गुंड व नगरसेवकाने भाजपात प्रवेश केल्याने राजकीय वर्तुळात सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. विशेष म्हणजे वनमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यावेळी उपस्थितीत होते.

मागील पाच वर्षांपासून चंद्रपूर मनपात भाजपची सत्ता आहे. महिनाभरावर येऊन ठेपलेल्या मनपा निवडणुकीसाठी भाजपने आता तयारी सुरू केली आहे. अशातच कुख्यात गुंड नगरसेवक अजय सरकार यांनी सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत एका शानदार सोहळ्यात भाजपात पक्ष प्रवेश झाला. मात्र, हत्येच्या गुन्ह्यासह 11 गुन्हे दाखल असलेल्या अजय सरकार यांचा भाजप प्रवेशाने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

दरम्यान, अजय सरकार हे मावळत्या चंद्रपूर मनपातील अपक्ष नगरसेवक असून हत्या-दंगेसारखे गुन्ह्याची नोंद आहे. मागील वर्षभरात टोळीयुद्ध सदृश्य अनेक प्रकरणात अजय सरकार याचा सहभाग राहिला आहे. बंगाली कॅम्प भागात अजय सरकार यांचे मोठे वर्चस्व आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com