वाघ नखांवरून आदित्य ठाकरेंनी केलेल्या टीकेवर मंत्री गिरीश महाजन यांचा पलटवार

वाघ नखांवरून आदित्य ठाकरेंनी केलेल्या टीकेवर मंत्री गिरीश महाजन यांचा पलटवार

लंडनमधून छत्रपती शिवाजी महाराज यांची वाघ नखं महाराष्ट्रात आणली जाणार आहेत.

मंगेश जोशी, जळगाव

लंडनमधून छत्रपती शिवाजी महाराज यांची वाघ नखं महाराष्ट्रात आणली जाणार आहेत. यावरुन आदित्य ठाकरे यांनी सरकारवर टीका केली होती. आदित्य ठाकरे म्हणाले की, छत्रपती शिवरायांच्या वाघ नखांसाठी परदेशात जाणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनी वाघनखे नक्की शिवरायांनी वापरलेली आहेत का, याची तपासणी करावी. असे म्हणाले होते.

याच पार्श्वभूमीवर आता ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. गिरीश महाजन म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांचे वाघ नख व जगदंबा तलवार हा आमचा हस्ते चा विषय असून त्यामुळे आदित्य ठाकरे यांना नेमकी काय माहिती आहे त्याचे त्यांनी पुरावे द्यावे. आदित्य ठाकरे यांनी काहीही उगाच वक्तव्य करू नये राजकारण करायला तुम्हाला अनेक विषय आहे असे म्हणत आदित्य ठाकरेंच्या वक्तव्यावर मंत्री गिरीश महाजन यांनी पलटवार केला आहे.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com