Goa CM Oath Taking Ceremony |  प्रमोद सावंत यांनी दुसऱ्यांदा घेतली गोव्याच्या मुख्यमंत्री पदाची शपथ

Goa CM Oath Taking Ceremony | प्रमोद सावंत यांनी दुसऱ्यांदा घेतली गोव्याच्या मुख्यमंत्री पदाची शपथ

Published by :
Shweta Chavan-Zagade

उत्तर प्रदेशातील शपथविधी पार पडला असून यावेळी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्याचप्रकारे गोव्याच्या मुख्यमंत्रीपदी प्रमोद सावंत (CM Pramod Sawant) हे देखील दुसऱ्यांदा विराजमान होणार आहेत. याच दरम्यान आज (सोमवार, 28 मार्च) गोव्याचे 14 वे मुख्यमंत्री म्हणून डॉ. प्रमोद सावंत यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. गोव्याचे ते दुसऱ्यांदा मुख्यमंत्री बनले आहेत. राज्यपालांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. देशातील सर्वात लहान असलेल्या किनारपट्टीच्या राज्यात भाजपने 40 पैकी 20 जागा जिंकल्या आहेत.  सावंत कोंकणी भाषेत शपथ घेतली.

या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM narendra modi), संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Defence Minister Rajnath Singh) यांची विशेष उपस्थितीत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com