पार्थ पवारांनी घेतली शंभूराज देसाईंची भेट; गोपीचंद पडळकरांचा मोठा दावा

पार्थ पवारांनी घेतली शंभूराज देसाईंची भेट; गोपीचंद पडळकरांचा मोठा दावा

राष्ट्रवादीचे नेते पार्थ पवार यांनी आज शिंदे गटाचे मंत्री शंभुराज देसाई यांची भेट घेतली. राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण आले होते.

कोल्हापूर : राष्ट्रवादीचे नेते पार्थ पवार यांनी आज शिंदे गटाचे मंत्री शंभुराज देसाई यांची भेट घेतली. यावरुन राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण आले होते. अशातच आता भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी मोठे विधान केले आहे. पार्थ पवार हे राष्ट्रवादीत अस्वस्थ असल्यामुळेच त्यांनी शंभुराज देसाई यांची भेट घेतली असावी, असे त्यांनी म्हंटले आहे. यामुळे आता राजकीय वर्तुळात नवीच चर्चा रंगली आहे.

पार्थ पवारांनी घेतली शंभूराज देसाईंची भेट; गोपीचंद पडळकरांचा मोठा दावा
पंतप्रधान मोदींच्या सभेसाठी तोडली विद्यापीठाची भिंत; विद्यार्थी आक्रमक

रोहित पवार आमदार झाले. बारामती अ‍ॅग्रो त्यांच्याकडे आहे. आणि आता मुंबई क्रिकेट बोर्डाचे अध्यक्षही रोहित पवार झाले आहे. अशात आजोबांकडून अन्याय होत असल्याची भावना पार्थ पवार यांची असेल. पार्थ पवार अस्वस्थ असल्यामुळे त्यांनी शंभूराजे देसाई यांची भेट घेतली असावी. पार्थ पवार यांनाही राजकारणात स्थिर व्हायचे असेल. पण, भेटीत काय चर्चा झाली हे मला माहित नाही, असेही गोपीचंद पडळकर यांनी म्हंटले आहे.

आम्ही यावेळी बारामतीसह सर्व जागा जिंकू. गेल्या 8 वर्षात विकास करण्यात मोदी सरकार अग्रेसर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबई दौऱ्याला दुसरा कोणता रंग देऊ नये. विकासकामांचा शुभारंभ आज होतोय. सकारात्मक बदल होतोय, असेही त्यांनी सांगितले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com